मुंबई महापालिका निवडणूक, महायुतीचं ठरलं; भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागा लढणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. भाजप आणि शिवसेनेत दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून, भाजप १३७ जागांवर तर शिवसेना ९० जागांवर लढवणार आहे.



मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी महायुती एकत्रितपणे लढत असून, भाजप आणि शिवसेना आपापल्या कोट्यातून मित्रपक्षांना काही जागा देणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही आठवड्यांपासून जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. सुरुवातीला भाजपने १५० हून अधिक जागांची मागणी केली होती, तर शिवसेनेने १०० च्या आसपास जागा हव्या असल्याचे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर झालेल्या बैठका आणि वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा तिढा सुटला. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील चर्चा यशस्वी ठरल्या. मंगळवारी एबी फॉर्मचे वाटप पूर्ण करून दोन्ही पक्षांचे उमेदवार नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे.




Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

मुंबई महापालिका निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात २७ उमेदवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक; अर्ज विक्री साडेअकरा हजारांची, भरले गेले फक्त ४०१

शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्याने अर्ज भरणाऱ्याचे घटले प्रमाण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले

राखी जाधव भाजपात तर मनिषा रहाटे, पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी)

एकाच कुटुबांत दोघांना उमेदवारीची लॉटरी

विविध राजकीय पक्षांची एकाच कुटुंबावर मेहेरबानी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी