बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचं निधन

ढाका: बांग्लादेशच्या पहिला महिला पंतप्रधान खालिदा जिया यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्या वयोमानानुसार उद्भावणाऱ्या आजारपणाचा सामना करत होत्या. अखेर ढाका येथील एवरकेयर रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. लिव्हर सिरोसिस, हृदयविकार आणि मधुमेहासारख्या अनेक व्याधींशी त्या झुंज देत होत्या, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. खालिदा जिया २० हून अधिक दिवसांपासून ढाका येथील रुग्णालयात दाखल होत्या. २३ नोव्हेंबर रोजी त्यांना हृदय आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर देश-विदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते.


खालिदा जिया यांचा राजकीय प्रवास बांगलादेशच्या राजकारणात महत्त्वाचा आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या त्या विरोधक होत्या. त्या १९९१ ते १९९६ हा काळ बांगलादेशच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान म्हणून गादीवर बसल्या होत्या. यानंतर त्यांनी पुन्हा २००१ ते २००६ मध्ये बांगलादेशचे पंतप्रधानपद भूषवले. त्यांचे पती आणि माजी राष्ट्रपती जिया-उर-रहमान यांच्या हत्येनंतर त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. मात्र, २०१८ मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, त्यानंतर त्यांनी बराच काळ हा नजरकैदेत काढला.


खालिदा जिया यांना ८ फेब्रुवारी २०१८ रोजी ढाका इथल्या स्पेशल कोर्टने जिया अनाथालय ट्रस्टच्या नावाने सरकारी पैशांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपात ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शेख हसीना यांनी जेव्हा देश सोडला तेव्हा जिया यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर चांगले उपचार मिळावे म्हणून त्या लंडनला गेल्या होत्या तिथे 4 महिने उपचार घेतले आणि 6 मे रोजी त्या पुन्हा मायदेशी परतल्या. मात्र अचानक त्यांना मागच्या काही दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने ढाका इथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आज सकाळी 6 च्या सुमारास त्यांचं निधन झालं.

Comments
Add Comment

मोदींप्रती मला आदर; ते माझे जवळचे मित्र!

दावोसमधील आर्थिक परिषदेत ट्रम्प यांच्यांकडून कौतुकाचा वर्षाव दावोस: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

Pakistan Karachi Massive Fire : पाकिस्तानमध्ये अग्नितांडव! अख्खी इमारत जळून खाक, तब्बल 'इतक्या' जणांचा होरपळून मृत्यू

कराची : पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात एका बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण देश

भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामंजस्य करारानंतर वर्षभरात उद्योग उभारणीचे दावोस येथे कौतुक दावोस : “जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

अमेरिकेत घडत आहेत धक्कादायक घडामोडी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

वाशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक