३७५ कोटींच्या आयपीओसाठी WOG Technologies Limited कडून सेबीकडे अर्ज दाखल

मोहित सोमण: डब्लूओजी वोग टेक्नॉलॉजी लिमिटेड (WOG Technologies Limited) कंपनीने आज सेबीकडे आयपीओसाठी डीएचआरपी (Draft Red Hearing Prospectus DHRP) सादर केला आहे. ३७५ कोटी रुपयांच्या इशूसाठी हा अर्ज करण्यात आला असून अद्याप प्राईज बँड निश्चित करण्यात आला नाही. १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या १० रूपये प्रति शेअरप्रमाणे ४३२८०० इक्विटी शेअर्सचा हा ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहे. माहितीनुसार, तर फ्रेश इशूपैकी १० रूपये दर्शनी मूल्यानुसार ३७५००.०० लाखांपर्यंत मूल्यांकन असलेल्या शेअरची विक्री करण्यात येईल असे कंपनीने पब्लिक फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चाच्या गरजेसाठी (Working Capital Requirments), बेल कुलिंग टॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अतिरिक्त ५०% भागभांडवल (Stake) खरेदी करण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. आयपीओ फायलिंगनुसार Unistone Capital Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Bigshare Services Pvt Ltd आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. बीएसई व एनएसईवर हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार असून अद्याप तारखेची निश्चिती करण्यात आलेली नाही.


एक्सचेंजमधील माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ५०% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) ३०% वाटा उपलब्ध असणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ झाली असून संपूर्ण २०२४-२५ आर्थिक वर्षात कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) १४८७% वाढ झाली आहे. तिमाही बेसिसवर मार्च तिमाहीतील तुलनेत १६६.३५ कोटी तुलनेत जून तिमाहीत ४१.६५ कोटींवर उत्पन्न (Total Income) घसरले आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मार्च महिन्यातील ४४.२४ कोटी तुलनेत ९.६८ कोटींवर घसरले होते.


यासह आर्थिक बाबतीत बघितल्यास, कंपनीच्या आयपीओपूर्व आरोई (Return on Equity) ७१.७९% व आरोसीई (Return on Capital Employed ROCE) ५१.३२% आहे. डेट टू इक्विटी गुणोत्तर (Debt to Equity Ratio) ०.१८% आहे. सत्यपाल सिंह, सुनिल कुमार, अमृता पनवार हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ८८.६२% आहे.


२०१० मध्ये स्थापन झालेल्या WOG टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने औद्योगिक आणि नगरपालिका ग्राहकांसाठी एकात्मिक पाणी (Integration of Water),सांडपाणी आणि पर्यावरणीय उपायांची रचना करून ती सेवा कंपनी पुरवते. यासह ही कंपनी विविध जागतिक क्षेत्रांमध्ये शाश्वत प्रक्रिया (Sustainable Process) पुनर्वापर (Recycle) आणि कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते.


कंपनीच्या पोर्टफोलिओ सेवेत WOG टेक्नॉलॉजीज पाणी प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रणाली, शून्य द्रव उत्सर्जन (Zero Liquid Emissions) उपाय,कचरा ते ऊर्जा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प आणि प्रगत प्रक्रिया अभियांत्रिकी यांसारख्या सेवा प्रदान करते, जागतिक स्तरावर ईपीएसी (EPC) (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) आणि O&M (संचालन आणि देखभाल) या सेवांचाही समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही कंपनी ऊर्जा, रसायने, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया आणि नगरपालिका यांसारख्या उद्योगांना सेवा देते. अद्याप सूचीबद्ध होण्याची तारीख अनिश्चित असून पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी निर्णय घेऊ शकते.

Comments
Add Comment

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, चिन्हाच्या वादावर निघाला तोडगा

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

आताची सर्वात मोठी बातमी: अर्थव्यवस्थेतील 'फंडामेटल' अतिशय मजबूत - RBI २०२४-२५ वार्षिक अहवाल

मोहित सोमण: 'भारताची अर्थव्यवस्था मजबूत फंडामेंटलसह जगातील वेगवान अर्थव्यवस्था म्हणून आपले मार्गक्रमण सुरू

IIP November Data: 'मोदी' सरकारच्या काळात आणखी एक विक्रम, नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात दोन वर्षांतील विक्रमी वाढ!

मोहित सोमण: आज भारत सरकारच्या सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने औद्योगिक उत्पादनाची नोव्हेंबर महिन्यातील

मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत!

मंत्री नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन; सुरक्षित मुंबईसाठी महायुती हा सक्षम पर्याय मुंबई : “टाटा सामाजिक

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल