मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. सेन्सेक्स ९२ व निफ्टी ३६ अंकाने उसळला आहे. दोन्ही बँक निर्देशांकातही वाढ झाल्याचे दिसत असले तरी टेक्निकल पाहता सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टी किरकोळ घसरणीचे अथवा सपाट (Flat) बाजाराचे संकेत मिळत होते. जागतिक स्तरावरील भूराजकीय अस्थिरतेचा फटका आजही बसण्याची शक्यता असल्याने ख्रिसमस रॅलीचा इफेक्ट अखेरच्या सत्रात सत्रात कायम राहिल का हे प्रश्नचिन्ह असले तरी इस्त्राईल इराण यांच्यातील युद्ध, अमेरिकेकडून रशिया युक्रेन यांच्यातील तोडगा काढण्यासाठी सुरु झालेला प्रयत्न व कमोडिटी बाजारातील अस्थिरता व परदेशी गुंतवणूकदारांची विक्री या एकत्रित कारणांचा परिणाम शेअर बाजारात आज जाणवू शकतो. दरम्यान बाजारातील गेल्या तीन सत्रातील घसरलेला बँक निफ्टी आज तेजीत येतो का यावर सपोर्ट लेवलची गणिते अवलंबून असतील. दुसरीकडे आज दिवसभरात प्रसिद्ध होणार असलेल्या औद्योगिक उत्पादन आकडेवारीकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बँक,आयटी, मेटल शेअर्समध्ये होत असलेल्या वाढीमुळे बाजाराला आधार मिळण्याची दाट शक्यता आहे. बाजार घसरल्यास बाय ऑन डिप्स रणनीती गुंतवणूकदार कायम ठेवतील का यावरही बाजाराचे लक्ष केंद्रित असणार आहे.
सुरूवातीच्या कलात आयटी, बँक, मेटल, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये वाढ झाली असून घसरण हेल्थकेअर, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, पीएसयु बँक निर्देशांकात दिसत आहे. आशियाई बाजारातही बहुतांश निर्देशांकात तेजी दिसत आहे. प्रामुख्याने काल युएस बाजारातही अखेर रॅलीने न होता डाऊ जोन्स (०.१४%) वगळता एस अँड पी ५००, नासडाक कंपोझिट निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज अस्थिरता अपेक्षित असून सोने चांदी व ईटीएफ गुंतवणूकीतही आज अस्थिरता अपेक्षित आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (८.०८%), हिंदुस्थान कॉपर (५.९६%), एचबीएल इंजिनिअरिंग (४.७५%), एचईजी (४.३०%), सेल (३.८५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण असाही इंडिया (३.०१%), नुवामा वेल्थ (२.७५%), एम अँड एम फिनसर्व्ह (२.३५%), रेडिको खैतान (१.७३%), सिटी युनियन बँक (१.६२%), क्राफ्ट्समन ऑटो (१.३८%) समभागात झाली आहे.