मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या मतदान प्रक्रिया प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सोमवारी २९ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे. मुंबईत विविध सात ठिकाणी तीन सत्रांमध्ये पार पडलेल्‍या या प्रशिक्षणात निवडणुकीसाठी अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले आहेत. मतदान नियमावलीची माहिती घेतच अधिकारी - कर्मचा-यांनी उपस्थित केलेल्‍या शंकांचे निरसन करण्‍यात आले.


या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व शंकांचे सविस्तर निरसन करून, आत्मविश्वासाने व नियमबद्ध पद्धतीने निवडणूक कामकाज पार पाडावे, असा मार्गदर्शक संदेश देण्यात आला. मतदानानंतर सादर करावयाची कागदपत्रे, अहवाल सादरीकरण व वरिष्ठ अधिकाऱयांशी समन्वय कसा ठेवावा, यावरही भर देऊन सर्व अधिकारी-कर्मचाऱयांनी जबाबदारीने व दक्षतेने काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन करण्‍यात आले.


मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सुमारे ५० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या प्रशिक्षणास मंगळवारी २९ डिसेंबर २०२५ पासून सुरूवात झाली.


या प्रशिक्षणात संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्‍होटिंग मशीन (ईव्हीएम), बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत, निवडणूकविषयक कायदेशीर तरतुदी, माननीय भारत निवडणूक आयोगाच्या तसेच माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र मार्गदर्शक सूचना, टपाली मतदानाची प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्रांची तपासणी आदी बाबींचा समावेश आहे


मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची रचना, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यानंतर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान अधिकाऱयांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये व जबाबदाऱ्या, तसेच मतदान केंद्राध्यक्षांची मतदान केंद्र परिसरातील जबाबदारी, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा व महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही याबाबत अधिकारी, कर्मचाऱयांना मार्गदर्शन करण्यात आले.


ईव्हीएम संयंत्रांचे प्रात्यक्षिक


बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) द्वारे पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रांची रचना, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची कार्यपद्धती याबाबत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱयांना प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल घेण्याची अचूक व नियमबद्ध प्रक्रिया, मतदानादरम्यान उद्भनाऱ्याचा संभाव्य तांत्रिक अडचणींवर तत्काळ करावयाच्या उपाययोजना, तसेच मतदान संपल्यानंतर ईव्हीएम यंत्रे सुरक्षितरीत्या सील करून संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Comments
Add Comment

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि

मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील