Monday, December 29, 2025

ठाण्यात गावदेवी मातेचा पालखी सोहळा

ठाण्यात गावदेवी मातेचा पालखी सोहळा

ठाणे : ठाणे पूर्व भागातील आई चिखलादेवी (गावदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२६ संपन्न होणार आहे. आगरी कोळी बांधवांची कुलदैवत कोपरीची ग्रामदैवत म्हणून आई चिखलादेवीची ओळख आहे. या कोपरी परिसराची ग्रामदैवत असलेल्या चिखलादेवीचा पालखी सोहळा आगरी कोळी आणि कोपरी परिसरातील रहिवाश्यांच्यावतीने दिमाखात साजरा केला जातो.

ग्रामदैवत असलेल्या चिखलादेवीच्या मंदिराला १०० वर्षांपेक्षा मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. देवीच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे २० वे वर्ष आहे. या पालखी सोहळ्यामध्ये भजन, कीर्तन, वेगवेगळ्या वेशभूषा करून लहान मुले तसेच महिलावर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये येथील नागरिक एकच रंगाचे कपडे परिधान करून या सोहळ्यात सामील होतात. यंदाचा पालखी सोहळ्याचा रंग लाल आहे. भाविकांनी या सोहळ्यास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन सोहळा समितीने केले आहे.

Comments
Add Comment