मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात २७ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिला यादीत ३७ उमेदवारांचा समावेश होता. यामुळे मुंबईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन याद्यांच्या माध्यमातून एकूण ६४ उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई मनपासाठी भारतीय जनता पार्टीने १०५ तर उबाठाने ४२ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या व्यतिरिक्त मुंबई मनपासाठी काँग्रेसने ८७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात, राष्ट्रवादी काँग्रेसने ३७, समाजवादी पक्षाने २१, आम आदमी पार्टीने ५१, राष्ट्रीय समाज पक्षाने सहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सहा उमेदवारांचा समावेश आहे. याआधी मुंबई ...
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. अतिशय कमी वेळ उरला असताना विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार ३० डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील.
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी
