एकाच कुटुबांत दोघांना उमेदवारीची लॉटरी

विविध राजकीय पक्षांची एकाच कुटुंबावर मेहेरबानी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे अंतिम करून त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. त्यामुळे पक्षांकडून ज्यांना अधिकृत मान्यतेचा ए व बी फॉर्म प्राप्त झाला त्यांनी आपले उमेदवारी उर्ज भरले असून काहींचे अर्ज मंगळवारी शेवटच्या दिवशी भरले जाणार आहे. मात्र विविध राजकीय पक्षांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये काँग्रेस, भाजप, उबाठा, शिवसेना आणि राष्ट्र्वादी काँग्रेस आदी पक्षांनी एकाच घरात दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे एका बाजुला उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंउखोरी होत असल्याचे दिसून आले, तिथेच विविध राजकीय पक्षांनी एकाच घरात दोघांना उमेदवारी दिल्याचेही पहायला मिळाले आहे.

मुंबईतील प्रभाग क्रमांक १९१मधून माजी आमदार सदा सरवणकर यांचे कन्या प्रिया आणि प्रभाग क्रमांक १९४मधून त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना शिवसेनेच्यावतीने उमदेवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक २२६मधून भाजपच्यावतीने मकरंद नार्वेकर आणि प्रभाग क्रमांक २२७मधून हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मकरंद नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत, हर्षिता नार्वेकर या त्यांच्या वाहिनी आहेत. सन२०१७च्या निवडणुकीतही मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर निवडून आल्या होत्या. मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १४२मधून उबाठाच्यावतीने माजी नगरसेविका सुनंदा लोकरे आणि प्रभाग क्रमांक १४१मधून माजी नगर सेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विठ्ठल लोकरे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडून आले. सध्या ते उबाठामध्ये आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभाग क्रमांक १६५मधून अब्दुल रशिद कप्तान मलिक, प्रभाग क्रमांक १६८मधून डॉ सईदा खान आणि प्रभाग क्रमांक १७०मधून बुशरा परवीन मलिक या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे तिन्ही उमेदवार नबाव मलिक आणि आमदार सन्ना मलिक यांचे नातेवाईक आहेत.. कप्तान मलिक आणि डॉ सईदा खान हे नवाब मलिक यांचे भाऊ बहिण आहेत तर बुशर परवीन मलिक या वहिनी आहेत. त्यामुळे मलिक कुटुंबात तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसचे मालाडमधील आमदार अस्लम शेख यांनी आपल्या बहिणीला पुन्हा एकदा संधी दिली आहे. अस्लम शेख यांची बहिण कमरजहाँ सिद्दीकी यांना प्रभाग ३३मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर आपल्या मुलाला हैदर अली शेख यांना प्रभाग क्रमांक ३४ उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केले.

एकाच कुटुंबात दोघांना तसेच तिघांना दिली उमेदवारी



  1. कमरजहाँ सिध्दीकी आणि हैदर शेख (अस्लम शेख यांची बहिण आणि मुलग)

  2. समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर (भाऊ बहिण)

  3. विठ्ठल लोकरे आणि सुनंदा विठ्ठल लोकले (नवरा बायको)

  4. मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर ( दिर भावजय)

  5. कप्तान मलिक आणि डॉ सईदा खान, बुशरा परवीन मलिक (भाऊ बहिण आणि वहिनी)

Comments
Add Comment

मुंबई महापालिका निवडणूक, महायुतीचं ठरलं; भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागा लढणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. भाजप आणि शिवसेनेत

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

मुंबई महापालिका निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात २७ उमेदवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक; अर्ज विक्री साडेअकरा हजारांची, भरले गेले फक्त ४०१

शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्याने अर्ज भरणाऱ्याचे घटले प्रमाण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले

राखी जाधव भाजपात तर मनिषा रहाटे, पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी)