पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा निर्णय
जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
मुंबई : देशभरातील वीज ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात विजेच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय विद्युत नियामक आयोग पावर ट्रेडिंग एक्स्चेंजवर लागणाऱ्या ट्रॉझेक्शन शुल्क कमी करण्याच्या विचारात आहे. सीईआरसी च्या निर्णयाचा उद्देश विजेचा दर कमी करणे हा आहे.
या सुधारणांमुळे कार्यक्षमता वाढविण्यास, तरलतेची स्थिती मजबूत करण्यास आणि वेगवेगळ्या एक्सचेंजेसमध्ये किमती तर्कसंगत करण्यास मदत होणार आहे. केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे वीज खरेदीदारांसाठी एकूण खर्च कमी होऊ शकतो. दोन वर्षांहून अधिक काळ विचारविनिमय केल्यानंतर या वर्षी जुलैमध्ये सीईआरसी ने बाजार एकत्रीकरणाला मान्यता दिलीय. जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. बाजार एकात्मता म्हणजे वेगवेगळ्या एक्स्चेंजेसमध्ये वीज खरेदी आणि विक्री एकाच प्रणालीमध्ये एकत्रित करणे, जेणेकरून एकच किंमत निश्चित होण्यास मदत होईल.
केंद्रीय वीज नियामक आयोग अनेक पैलूंची तपासणी करत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, डिसेंबर २०२५ मध्ये पॉवर एक्स्चेंजेसकडून आकारल्या जाणाऱ्या व्यवहार शुल्काचा आढावा घेण्यासाठी सीईआरसीने एक सल्लामसलत पत्र तयार केलं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय वीज नियामक आयोग सध्याची व्यवहार शुल्क रचना, जी प्रति युनिट दोन पैसे मर्यादित आहे, ती त्या बाजारपेठेसाठी योग्य आहे जेथे जिथे व्यापाराचे प्रमाण वेगाने वाढले आहे. सध्या ज्या पर्यायांचा विचार केला जातोय, त्यातील ट्रेडिंग सेगमेंटसाठी प्रतियुनिट १.५ पैशाच्या पिक्स्ड ट्रांझेक्शन शुल्क आहे.






