डिफेन्स व मरीन शेअर्समध्ये आज वाढ 'या' प्रमुख दोन कारणांमुळे!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात डिफेन्स स्टॉक्समध्ये तुफान वाढ झाली आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच संरक्षण क्षेत्रातील शेअर उसळल्याने निफ्टी डिफेन्स इंडेक्स थेट १% उसळला होता. दुपारी १२.१९ वाजेपर्यंत ०.२०% उसळत ७७९५.९० पातळीवर व्यवहार करत आहे. प्रसारमाध्यमांनी आज डीएससी बैठक होणार असल्याचे वृत्त दिल्याने आज शेअर बाजारात संरक्षण कंपनीच्या शेअर्समध्ये वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. डीएसी (Defence Acquisition Council DAC) काऊन्सिलची बैठक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झाली आहे. आगामी धोरणात्मक निर्णय म्हणून येणाऱ्या भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे ठरवले गेल्याने या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीत ८०००० कोटींच्या या डीलला मान्यता दिली गेल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले.


गेल्या दोन महिन्यांपासून डिफेन्स इंडेक्सने चांगल्या प्रमाणात रिकव्हरी केल्याचे आपण पाहिले होते. आगामी बैठकीत यावर अंतिम मोहोर लागेल. याशिवाय पायाभूत सुविधा उभारणीसाठी शिपबिल्डिंग कंपनीच्या शेअर्समध्येही आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रामुख्याने घरगुती मरिन इंडस्ट्रीजला मोठ्या प्रमाणात चालन देण्यासाठी सरकारने ४४७०० कोटींच्या योजनेला मान्यता दिल्याने भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेला (Logistics Ecosystem) अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.


सकाळच्या सत्रात डिफेन्स व मरिन शेअर असलेल्या माझगाव डॉकचा शेअर ३% पेक्षा अधिक प्रमाणात तर भारत डायनामिक्स २%, हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१%), स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज (५%), कोचीन शिपयार्ड (१%) या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. दरम्यान डेटा पँटर्न, सोलार इंडस्ट्रीज इंडिया,पारस डिफेन्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण किंबहुना दुपारपर्यंत घसरण झाली आहे. तर दुसऱ्या घडामोडीत मरिन इंडस्ट्रीजला सरकारने मोठ्या प्रमाणात चालना दिल्यामुळे शेअरला मोठा फायदा झाला.


परवा बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने (MoPSW) शनिवारी विकासनिधीची घोषणा केली होती जहाजबांधणीचे दोन प्रमुख उपक्रम हाती घेणार आहे ते म्हणजे जहाजबांधणी वित्तीय सहाय्य योजना (SBFAS) आणि जहाजबांधणी विकास योजना (SbDS) असून जहाजबांधणी वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत, सरकार प्रत्येक जहाजासाठी १५-२५% पर्यंत आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुमारे २४७३६ कोटी रुपये खर्च करेल अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.


१९८९८ कोटी रुपयांच्या खर्चासह जहाजबांधणी विकास योजना, संस्थांना दीर्घकालीन क्षमता निर्माण करण्यास मदत करेल. ही योजना कंपन्यांना ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प बांधण्यासाठी तसेच विद्यमान ब्राउनफिल्ड प्रकल्पांचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी मदत करेल. याविषयी आणखी अधिकृत निवेदनात दरम्यान, 'एसबीडीएस अंतर्गत, ग्रीनफिल्ड जहाजबांधणी क्लस्टर्सना सामान्य समुद्री कंपन्यांसाठी १००% भांडवली आधार मिळेल' असे म्हटले आहे.


सरकारने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ही योजना लहान सामान्य, मोठ्या सामान्य आणि विशेष जहाजांसाठी श्रेणीबद्ध सहाय्य प्रदान करते. या योजनेत जहाजबांधणी उपक्रमातून रचनात्मक सुधारणा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जहाजबांधणी मिशनची स्थापना करण्याची तरतूद आहे. ही योजना कंपन्यांना नवीन ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी तसेच विद्यमान ब्राऊनफिल्ड प्रकल्पांच्या विस्तार आणि सुधारणेसाठी सहाय्य प्रदान करणार आहे. त्यामुळे या मरिन व हेवी इंडस्ट्रीज शेअर्समध्ये आज वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात १% पेक्षा वाढलेला गार्डनरीच शीप बिल्डर्स मात्र दुपारनंतर किरकोळ घसरला आहे.

Comments
Add Comment

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी