नवी मुंबईत ‘भगत’ कुटुंबातील उमेदवारीवरून वाद

नवी मुंबईत ‘भगत’कुटुंबातील उमेदवारीवरून वाद


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. एकाच घरातील व्यक्तींना तीन ते चार, तर काही ठिकाणी चार ते पाच जागांची उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघाशी संबंधित नेत्यांनी केला आहे.


निवडणुकांचे बिगूल वाजले असून काही पक्षांनी उमेदवार निश्चित करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. नवी मुंबईत भाजपच्या अंतर्गत गोटात उमेदवारीवरून अस्वस्थता वाढताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये एकाच कुटुंबाला एकापेक्षा अधिक तिकीट देण्याच्या हालचालींमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.


यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना एका भाजप पदाधिकाऱ्याने सांगितले की, “२०१४ नंतर देशातील राजकीय वातावरण बदलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचे विचार देशभर पोहोचले. भाजपचे कार्यकर्ते तन-मन-धन अर्पण करून काम करतात. सहा वर्षांत पक्षात प्रवेश केलेल्या काही व्यक्ती चार-चार तिकिटांची मागणी करत आहेत.” या पदाधिकाऱ्यांनी पुढे आरोप केला की, “अयोध्येत राम मंदिर उद्घाटन, कलम ३७० हटविणे, पंतप्रधानांचा वाढदिवस आणि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविले जाणारे सेवा कार्यक्रम – या कोणत्याही उपक्रमांत संबंधित मंडळींचा सहभाग दिसून आला नाही. पक्षाचे नाव वापरायचे, मात्र पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहायचे.


कार्यकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की प्रभाग क्रमांक १८ मधील दशरथ भगत यांना एकापेक्षा जास्त तिकीट देऊ नये आणि निष्ठावंत, सातत्याने काम करणाऱ्यांना संधी द्यावी. २०१९ मध्ये दशरथ भगत, निशांत भगत आणि संदीप भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या बॅनरवर कमळाचे चिन्ह, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा स्थानिक आमदारांचे फोटो लावले नसल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. पक्षाने योग्य आणि न्याय्य निर्णय घेतला तर उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही मेहनत करू, मात्र तसे न झाल्यास “आम्हाला आमचा मार्ग वेगळा घ्यावा लागेल”, असा सूचक इशाराही काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Navi Mumbai Airport : एअरपोर्ट ते घर, आता प्रवास होईल सुखकर! नवी मुंबई एअरपोर्टवर विशेष 'प्रीपेड काउंटर' सज्ज; आता भाड्यासाठी घासाघीस नको

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ

नवी मुंबई विमानतळावरून अहमदाबादपर्यंत थेट उड्डाण

३१ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू नवी मुंबई : अकासा एअर या विमान कंपनीकडून ३१ डिसेंबरपासून नवी मुंबई

शिक्षकांकडून अमानुष वागणूक; लहानग्याच्या छळाप्रकरणी पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून अमानुष वागणूक

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

पनवेल : आई आणि तीच मूल मग मुलगा असो वा मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. आपलं

Devendra Fadanvis : विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर

Mumbai Local Horror : क्रूरतेचा कळस! लेडीज डब्यात घुसखोरी करणाऱ्या नराधमाची मुजोरी, १८ वर्षीय विद्यार्थिनीला ५० वर्षीय प्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकललं

नवी मुंबई : महिलांच्या डब्यात बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला हटकणे एका १८ वर्षीय तरुणीच्या