सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विजयचा शेवटचा चित्रपट ‘जाना नायकन’ असून तो ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. २७ डिसेंबर रोजी मलेशियामध्ये झालेल्या या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात विजय भावूक झाला आणि हा त्याचा शेवटचा चित्रपट असल्याचं त्याने स्पष्ट केलं.


अभिनयाला रामराम करत विजयने आता पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी त्याने ‘तमिलागा वेट्टी कझगम’ या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी तो करत आहे.


राजकारणात प्रवेशाबाबत बोलताना विजय म्हणाला, “माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे. लोक मला पाहण्यासाठी थिएटरबाहेर रांगेत उभे राहतात. म्हणूनच पुढील ३० ते ३३ वर्षे मी त्यांच्यासाठी रांगेत उभा राहण्यास तयार आहे.” तो पुढे म्हणाला, “चित्रपटसृष्टीत आलो तेव्हा वाळूचा किल्ला बांधण्याचं स्वप्न होतं, पण चाहत्यांनी मला राजवाडा दिला.”


एच. विनोद दिग्दर्शित ‘जाना नायकन’ चित्रपटात बॉबी देओल, पूजा हेगडे, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज आणि प्रियामणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. थलापतीने ‘मास्टर’, ‘लिओ’, ‘मर्सल’, ‘थेरी’, ‘बिस्ट’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतून चाहत्यांच्या मनावर कायमच नाव कोरल आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या