स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामन्यात स्मृती मानधनाने २७ धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचा पल्ला गाठला आहे. यासह तिच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.


भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना ही भारतीय फलंदाजीतील कणा म्हणून ओळखली जाते. डावाची सुरुवात करताना तिने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठी खेळी केली आहे. अखेर तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याच्या विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. असा पराक्रम करणारी ती जगातील चौथी फलंदाज ठरली आहे. तर सर्वात जलद १० हजार धावांचा पल्ला गाठणारी महिला फलंदाज ठरली आहे.


स्मृती मानधनाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील २८ व्या सामन्यात १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे. या यादीत भारताची माजी कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे. मिताली राजच्या नावे ३१४ डावांत १०८६८ धावा करण्याची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या सुजी बेट्सच्या नावे ३४३ डावांत १०६५२ धावा करण्याची नोंद आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या सी एडवर्ड्सच्या नावे ३१६ डावांत १०२७३ धावा करण्याची नोंद आहे.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे फलंदाज



  1. मिताली राज (भारत) -१०,६६८ धावा, ३१४ डावांत

  2. सुजी बेट्स (न्यूझीलंड) – १०६५२ धावा , ३४३ डावांत

  3. सी एडवर्ड्स (इंग्लंड) – १०२७३ धावा, ३१६ डावांत

  4. स्मृती मानधना (भारत) – १०,००० धावा, २८० डावांत

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण

भारताचे सलग चौथ्या टी-२० विजयाकडे लक्ष

आज तिरुवनंतपुरमला श्रीलंकेविरुद्ध सामना तिरुवनंतपुरम : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवर आधीच कब्जा मिळवलेल्या

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका