श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय


तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या विजयामुळे भारताने मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने वीस षटकांत दोन बाद २२१ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला वीस षटकांत सहा बाद १९१ धावा एवढीच मजला मारता आली. भारताने सामना ३० धावांनी जिंकला.


भारताच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना आठ विकेट राखून तर दुसरा सामना सात विकेट राखून जिंकला. हे दोन्ही सामने विशाखापट्टमण येथे झाले. यानंतर पुढील दोन सामने तिरुवनंतपुरम येथे झाले. भारताने तिसरा सामना आठ विकेट राखून तर चौथा सामना ३० धावांनी जिंकला. आता शेवटचा सामना मंगळवार ३० डिसेंबर २०२५ रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.


श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून स्मृती मानधनाने ४८ चेंडूत ८० धावा केल्या तर शफाली वर्माने ४६ चेंडूत ७९ धावा केल्या. रिषा घोषने १६ चेंडूत नाबाद ४० तर हरमनप्रीत कौरने दहा चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. श्रीलंकेकडून मालशा शेहानीने स्मृतीला तर निमाशा मदुशानीने शफालीला बाद केले.


धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेकडून हसिनी परेराने ३३, चामरी अथापथ्थुने ५२, इमेशा दुलानीने २९ (धावचीत), हर्षिता समरविक्रमने २०, कविशा दिलहारीने १३, नीलक्षीका सिल्वाने नाबाद २३, रश्मिका सेववंडीने पाच आणि कौशानी नुथ्यांगनाने नाबाद पाच धावांचे योगदान दिले. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि अरुंधती रेड्डीने प्रत्येकी दोन तर श्री चरणीने एक विकेट घेतली.


Comments
Add Comment

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण

भारताचे सलग चौथ्या टी-२० विजयाकडे लक्ष

आज तिरुवनंतपुरमला श्रीलंकेविरुद्ध सामना तिरुवनंतपुरम : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवर आधीच कब्जा मिळवलेल्या

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका