युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी युवा भारतीय ब्रिगेडची घोषणा केली आहे. या संघ निवडीत मुंबईच्या आयुष म्हात्रेची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबिया मध्ये होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी आयुष म्हात्रे भारताचे नेतृत्व करेल. विहान मल्होत्राची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. आयुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीचे फळ त्याला कर्णधारपदाच्या रूपाने मिळाले आहे.

विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. या दौऱ्यासाठी बिहारच्या वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा दुखापतीमुळे या दौऱ्यात उपलब्ध नसल्याने वैभवला ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

...असा आहे भारतीय संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर. एस. अम्रिश, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन.

विश्वचषकाचे वेळापत्रक :
यजमान : झिम्बाब्वे आणि नामिबिया
कालावधी : १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६
Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : जर्मनीवर ३-१ असा दणदणीत विजय; भारतीय महिला हॉकी संघाची विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी

ॲमस्टेलवीन : भारतीय महिला हॉकी संघाने FIH महिला हॉकी विश्वचषक २०२६मध्ये शानदार कामगिरी करत पाचव्या स्थानावर

Neeraj Chopra : नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत मिळवले स्थान

नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हंगामाची

Grand Chess Tour Final : प्रज्ञानानंदने रचला इतिहास, ग्रँड चेस टूर फायनल जिंकणारा पहिला भारतीय ठरला

सेंट लुईस : भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने फॅबियानो करूआनाचा पराभव करत इतिहास रचला आहे.

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग