विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. या दौऱ्यासाठी बिहारच्या वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा दुखापतीमुळे या दौऱ्यात उपलब्ध नसल्याने वैभवला ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
...असा आहे भारतीय संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर. एस. अम्रिश, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन.
विश्वचषकाचे वेळापत्रक :
यजमान : झिम्बाब्वे आणि नामिबिया
कालावधी : १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६