योगी आदित्यनाथ, नितेश राणे यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांना मोठी मागणी

मुंबईसह २९ महापालिकांमध्ये तोफा धडाडणार विरोधकांच्या नॅरेटीव्हला चोख उत्तर देणार


मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, आता प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांच्या तोफा या शहरांत धडाडणार आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी शहरांमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांना प्रचंड मागणी वाढली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभा मिळवण्यासाठी महायुतीचे उमेदवार पक्ष नेतृत्वाकडे जोरदार मागणी करू लागले आहेत.


मतदारांचा हिंदुत्वाकडे वाढता कल लक्षात घेऊन उमेदवारांना हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांची गरज भासत आहे. मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी, नाशिक, पुणे-पिंपरी-चिंचवड, आहिल्यानगर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये नितेश राणे यांच्या सभांना सर्वाधिक मागणी आहे. योगी आदित्यनाथ व पवन कल्याण यांच्या सभाही उत्तर भारतीय व हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचे मानले जात आहे.


ठाकरे बंधूंच्या ‘मराठी विरुद्ध अमराठी’ नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीची ही रणनीती प्रभावी ठरणार आहे. उबाठा गट व मनसेच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हिंदुत्वाच्या व्यापक नॅरेटिव्हने रोखण्याचा प्रयत्न महायुतीकडून होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अलीकडच्या भाषणांत हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पालिका निवडणुकीतही हा पॅटर्न अवलंबला जाणार आहे.


उबाठा गटाची अल्पसंख्याकांना साद


दुसरीकडे, उबाठा गट अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्यासाठी धडपड करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीशी संबंधित आरोपी रशीद मामू याला सोबत घेण्यात आले. मुंबईतही असेच प्रयोग पूर्वी झाले आहेत. हा मुद्दा हेरून महायुतीचे हिंदुत्ववादी नेते उबाठा आणि मनसेला लक्ष्य करणार आहेत. येत्या ३ जानेवारीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात योगी आदित्यनाथ, नितेश राणे आदी नेते प्रचारासाठी धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती