योगी आदित्यनाथ, नितेश राणे यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांना मोठी मागणी

मुंबईसह २९ महापालिकांमध्ये तोफा धडाडणार विरोधकांच्या नॅरेटीव्हला चोख उत्तर देणार


मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, आता प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांच्या तोफा या शहरांत धडाडणार आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी शहरांमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांना प्रचंड मागणी वाढली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभा मिळवण्यासाठी महायुतीचे उमेदवार पक्ष नेतृत्वाकडे जोरदार मागणी करू लागले आहेत.


मतदारांचा हिंदुत्वाकडे वाढता कल लक्षात घेऊन उमेदवारांना हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांची गरज भासत आहे. मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी, नाशिक, पुणे-पिंपरी-चिंचवड, आहिल्यानगर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये नितेश राणे यांच्या सभांना सर्वाधिक मागणी आहे. योगी आदित्यनाथ व पवन कल्याण यांच्या सभाही उत्तर भारतीय व हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचे मानले जात आहे.


ठाकरे बंधूंच्या ‘मराठी विरुद्ध अमराठी’ नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीची ही रणनीती प्रभावी ठरणार आहे. उबाठा गट व मनसेच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हिंदुत्वाच्या व्यापक नॅरेटिव्हने रोखण्याचा प्रयत्न महायुतीकडून होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अलीकडच्या भाषणांत हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पालिका निवडणुकीतही हा पॅटर्न अवलंबला जाणार आहे.


उबाठा गटाची अल्पसंख्याकांना साद


दुसरीकडे, उबाठा गट अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्यासाठी धडपड करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीशी संबंधित आरोपी रशीद मामू याला सोबत घेण्यात आले. मुंबईतही असेच प्रयोग पूर्वी झाले आहेत. हा मुद्दा हेरून महायुतीचे हिंदुत्ववादी नेते उबाठा आणि मनसेला लक्ष्य करणार आहेत. येत्या ३ जानेवारीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात योगी आदित्यनाथ, नितेश राणे आदी नेते प्रचारासाठी धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

बदलापूरमध्ये बिबट्याची दहशत ;लोकवस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला

ठाणे : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. बिबट्या वनक्षेत्र सोडून वारंवार मानवीवस्तीत प्रवेश करत आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

हादरवून टाकणाऱ्या लाखे कुटुंबाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले

नांदेड : महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुडखेड तालुक्यातील जवळा मोरार येथे नाताळच्या दिवशी लखे

झेलेन्स्की आणि ट्रम्प भेटीपूर्वी रशियाचा युक्रेनवर हल्ला! लष्करी बळाचा वापर करणार, पुतिनचा इशारा

अमेरिका: गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून दोन्ही देशातील संघर्ष टोकाला पोहोचला