फेस स्टीम किंवा चेहऱ्याला वाफ देण्याचे अनेक सौंदर्यदायी फायदे होतात . वाफ घेतल्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात, ज्यामुळे छिद्रांमध्ये साचलेली घाण, तेल आणि प्रदूषण सहज बाहेर पडते. तसेच, वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. स्टीम घेतल्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर स्टीम घेणे ही स्किनकेअरची जुनी आणि प्रभावी पद्धत आहे. स्टीम घेतल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लॉ येतो, त्वचा खोलवर स्वच्छ होते. जर फेस स्टीम योग्यरित्या घेतली, तर त्याचे परिणाम खूप गुणकारी ठरतो . खूप लोक साध्या पाण्यातूनच वाफ घेतात, परंतु स्किनकेअर एक्सपर्टच्या मते, जर पाण्यात ह्या दोन महत्वाच्या गोष्टी टाकल्या तर वाफ घेणे अधिक गुणकारी ठरतात.
जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला किंवा सायनसचा त्रास होतो, तेव्हा गरम वाफ घेतल्याने श्वसनमार्गातील घट्ट झालेला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे बंद झालेले नाक मोकळे होते आणि घशातील खवखव कमी होते. तसेच, गरम वाफ फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्याने श्वास घेताना होणारा त्रास कमी होतो आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळते, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. श्वसन विकारांसोबतच वाफ घेण्याचे सौंदर्यासाठीही मोठे फायदे आहेत.
वाफेमुळे चेहऱ्यावरील त्वचेची छिद्रे उघडतात, ज्यामुळे त्वचेच्या आत साचलेली घाण, धूळ आणि जास्तीचे तेल सहजपणे स्वच्छ होते. यामुळे ब्लॅकहेड्स आणि मुरुमांची समस्या कमी होऊन त्वचा तजेलदार दिसते. याशिवाय, वाफ घेतल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे दिवसाचा थकवा आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. तज्ञ सांगतात की, म्हणतात की बहुतेक लोक फेस स्टीममध्ये साध्या पाण्याचा वापर करतात, परंतु जर हिवाळ्यात आढळणाऱ्या काही गोष्टी या पाण्यात समाविष्ट केल्या तर फायदा आणखी वाढतो. यासाठी तुम्हाला एका भांड्यात पाणी चांगले उकळावे लागेल आणि उकळत असताना त्यात संत्र्याच्या काही साली आणि बीटरूटच्या पानांचे लहान तुकडे घालावे लागतील.
यानंतर, गरम पाणी काढून घ्या आणि नंतर डोक्यावर टॉवेल झाकून वाफ घ्या. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, संत्र्याची साल आणि बीटरूटच्या पानांच्या पाण्यातून जेव्हा वाफ घेतली जाते तेव्हा त्वचेची छिद्रे उघडतात आणि त्यांना नैसर्गिकरित्या जीवनसत्त्वे पुरवली जातात. अशा परिस्थितीत, जेव्हा त्वचेला थेट जीवनसत्त्वे मिळतात तेव्हा त्वचा लवकर उजळते आणि नैसर्गिक चमक येते. रक्ताभिसरण सुधारण्यातही हे खूप फायदेशीर ठरते . स्किनकेअर एक्सपर्ट्सच्या मते, ही फेस स्टीम आठवड्यातून 3 वेळा घेतली जाऊ शकते. याशिवाय जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर वाफवण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर अवश्य लावावे.