योगी आदित्यनाथ, नितेश राणेंसह हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांना मोठी मागणी

मुंबईसह २९ महापालिकांमध्ये तोफा धडाडणार; विरोधकांच्या नॅरेटीव्हला चोख उत्तर देणार


मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, आता प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांच्या तोफा या शहरांत धडाडणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी शहरांमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांना प्रचंड मागणी वाढली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभा मिळवण्यासाठी महायुतीचे उमेदवार पक्ष नेतृत्वाकडे जोरदार मागणी करू लागले आहेत.


मतदारांचा हिंदुत्वाकडे वाढता कल लक्षात घेऊन उमेदवारांना हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांची गरज भासत आहे. विशेषतः मुंबई, वसई-विरार, मिरा-भाईंदर, भिवंडी, नाशिक, पुणे-पिंपरी चिंचवड, आहिल्यानगर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये नितेश राणे यांच्या सभांना सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय योगी आदित्यनाथ आणि पवन कल्याण यांच्या सभाही उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचे मानले जात आहे.


ठाकरे बंधूंच्या 'मराठी विरुद्ध अमराठी' नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीची ही रणनीती प्रभावी ठरणार आहे. उबाठा आणि मनसेच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हिंदुत्वाच्या व्यापक नॅरेटिव्हने रोखण्याचा प्रयत्न महायुतीकडून होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अलीकडच्या भाषणांत हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पालिका निवडणुकीतही हा पॅटर्न अवलंबला जाणार आहे.



उबाठाची अल्पसंख्याकांना साद


दुसरीकडे, उबाठा गट अल्पसंख्यांक समाजाला जवळ करण्यासाठी धडपड करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीशी संबंधित आरोपी रशीद मामू याला सोबत घेण्यात आले. मुंबईतही असेच प्रयोग पूर्वी झाले आहेत. हा मुद्दा हेरून महायुतीचे हिंदुत्ववादी नेते उबाठा आणि मनसेला लक्ष्य करणार आहेत. येत्या ३ जानेवारीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात योगी आदित्यनाथ, नितेश राणे आदी नेते प्रचारासाठी धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

माहिममध्ये दोन जागांवर बोळवण, मनसे उबाठावर नाराज

माहिम विधानसभा उबाठा आणि मनसेची ठरणार डोकेदुखी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी सूर उमटवायला सुरुवात

मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार

काळोखे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर शिवसेना स्वस्थ बसणार नाही काळोखे कुटुंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ

संजय राऊत खासदार आणि सुनिल राऊत आमदार, आता संदीप राऊत नगरसेवक होणार ?

खासदार,आमदार आता भावाला बनवणार नगरसेवक विक्रोळीतील प्रभाग १११मधून इच्छुक म्हणून दावेदारी उबाठाचे दिपक सावंत,

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यावर निवडणूक विभाग ठाम

जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची नावे त्वरित कळवण्याचे केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी)

नाताळच्या सुट्टीत पर्यटनासाठी गुहागरला गेलेले तिघांचे कुटुंब समुद्रात बुडाले

गुहागर : नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी गुहागरला गेलेल्या मुथ्या कुटुंबातील तीन सदस्य समुद्रात बुडाले.

रामदास आठवले यांची मुंबईत १४ ते १५ जागांची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षासाठी १४