ऐन नाताळच्या सुट्टीत अमेरिकेत १८०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द


वॉशिंग्टन डी. सी. : ऐन नाताळच्या सुट्टीत अमेरिकेत कार्यरत विमान कंपन्यांची १८०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. विमान प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक जण वेगवेगळ्या विमानतळांवर अडकून पडले आहेत. सुट्टीत फिरायला जाण्याची योजना आखणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. हिमवादळामुळे उड्डाणे रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी ऐन सुट्टीच्या काळात मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे नियोजन पुरते कोलमडले आहे. दुसरीकडे कॅलिफोर्नियातील विनाशकारी पुरामुळे किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


देशाच्या मोठ्या भागात डेव्हॉन वादळाने थैमान घातल्याने ईशान्य आणि मध्यपश्चिम भागात जोरदार हिमवृष्टी झाली, तर कॅलिफोर्नियामध्ये विक्रमी पाऊस पडला, त्यामुळे सुट्टीतील प्रवासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत विमान कंपन्यांनी १८०२ उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच २२ हजारांपेक्षा जास्त उड्डाणांना विलंब झाला. यामुळे अनेकांचे हाल झाले.


अप्पर मिडवेस्ट, ईशान्य आणि मिड-अटलांटिक प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. हिमचटवृष्टी, गारपीट आणि गोठवणारी थंडी यामुळे हवाई प्रवास विस्कळीत झाला. न्यू यॉर्कमधील प्रमुख विमानतळ - जॉन एफ. केनेडी इंटरनॅशनल, नेवार्क लिबर्टी आणि लागार्डिया येथून होणारी विमान वाहतूक पुरती कोलमडली. अनुक्रमे जेटब्लू, डेल्टा एअर लाइन्स, रिपब्लिक एअरवेज आणि अमेरिकन एअरलाइन्स यांनी अनेक उड्डाणे रद्द केली.


विमान वाहतूक कोलमडल्यामुळे फटका बसलेल्यांना बदल शुल्क माफ केल्याचे अमेरिकन एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि जेटब्लूच्या प्रवक्त्यांनी सांगितले. कंपन्यांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेतील विविध प्रांतांच्या प्रशासनाने नागरिकांना उड्डाण रद्द झाले अथवा विलंबाने होत असले तरी विमानतळ सोडून इतरत्र जाणे टाळा, असे आवाहन केले आहे.


न्यू यॉर्क शहर आणि आसपासच्या भागात प्रति तास एक ते दोन इंच हिमवृष्टीचा अंदाज आहे. अमेरिकेतील काही भागांमध्ये ११ इंचांपर्यंत हिमवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ईशान्य अमेरिकेत हिमवादळाने मोठा तडाखा दिला. कॅलिफोर्नियामध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली, रस्ते पाण्याखाली गेले, भूस्खलन झाले आणि मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला. तीन लोकांचा मृत्यू झाला.


Comments
Add Comment

फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअ‍ॅप नियंत्रक मेटा कंपनीला कोर्टाचा दणका, भरावा लागणार अब्जावधींचा दंड

न्यू मेक्सिको : अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमधील कोर्टाच्या ज्युरीने 'मेटा' या सोशल मीडिया कंपनीला मुलांच्या मानसिक

Iran-US-Israel War : धक्कादायक! इस्रायलचा तेहरानमधील रुग्णालयावर हल्ला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले पाच दिवस थांबवण्याची घोषणा केली असतानाही

Iran-US-Israel War : अमेरिकेकडून युध्दविरामाची घोषणा तरीही इस्रायलकडून मात्र युद्ध सुरूच राहणार - पंतप्रधान नेतन्याहू

- इराण आणि लेबनॉनवरील हल्ले सुरूच राहतील - पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

Iran-US-Israel War : इराणकडून हल्ल्यासाठी पश्चिम आशियातील वीज, जल प्रकल्पांची यादी जाहीर

अमेरिकेकडून इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्यानंतर, त्याला प्रत्युत्तर म्हणून

रशिया इराणला गुप्तचर मदत पुरवत आहे, आमच्याकडे याचे पुरावे - राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की

पश्चिम आशियामध्ये सतत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की

टेक्सासमधील व्हॅलेरो रिफायनरीत भीषण स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश

व्हॅलेरो एनर्जीद्वारे चालवली जाणारी टेक्सासमधील पोर्ट आर्थर येथील रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना