शिक्षकांकडून अमानुष वागणूक; लहानग्याच्या छळाप्रकरणी पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून अमानुष वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन शिक्षकांविरुद्ध बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.


कामोठे येथील एका खासगी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून पालकांच्या तक्रारीनुसार, संबंधित विद्यार्थ्याचा दोन वेगवेगळ्या दिवशी छळ करण्यात आला. १४ नोव्हेंबर रोजी एका शिक्षकाने दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला बोलावून सहा वर्षांच्या मुलाच्या गालावर पाच ते सहा चापट मारण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या प्रकारावेळी संबंधित शिक्षक फक्त उपस्थितच नव्हता, तर तो हसत असल्याचाही गंभीर दावा पालकांनी केला आहे.


यानंतर २८ नोव्हेंबर रोजी इंग्रजीच्या तासादरम्यान दुसऱ्या एका शिक्षकाने याच मुलाला कंपास बॉक्सने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीमुळे चिमुकल्याच्या ओठाला मोठी सूज आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


मुलाने घरी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी बुधवारी दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांची भूमिका आणि शालेय वातावरणाचीही सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. लहान मुलांवर शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

विप्रो कंपनीचा तिमाही निकाल कमकुवत? ७% नफ्यात घसरण तरीही 'इतका' लाभांश जाहीर

मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत

जालना महापालिकेत भाजपचाच बोलबाला

जालना : जालना महानगरपालिकेवर स्वतःची सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. ६५ पैकी ४१ जागा जिंकून

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.