कोफोर्जकडून अमेरिकन आयटी कंपनीचे २.३५ अब्ज डॉलरला अधिग्रहण

मुंबई: एकूण जागतिक स्थितीत आयटी कंपन्यांच्या मार्जिनमध्ये व वाढीत घसरण झाली असताना कोफोर्ज (Coforge) या आयटी सेवा क्षेत्रातील कंपनीने सिलिकॉन व्हॅलीमधील आयटी व ए आय कंपनी असलेल्या 'एन्कोरा (एआय नेटिव) कंपनीचे २.३५ अब्ज डॉलरला अधिग्रहण (Acquisition) केले आहे. कंपनीच्या वर्क फ्लो व्यवस्थापन (Workflow Management) मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व तंत्रज्ञान सेवा पुरविणारी ही कंपनी कंपोझेबल ए आय प्लॅटफॉर्म आहे. या अधिग्रहणाचे मूल्य २.३५ अब्ज डॉलर्स निश्चित झाले आहे ज्यामध्ये १८१५ रुपये प्रति शेअर दराने (सुमारे २१% डायल्यूशन) प्रेफरेंशियल शेअर्सद्वारे इशू केले जाणारे १.८९ अब्ज डॉलर्सचे इक्विटी आणि ५५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज समाविष्ट आहेत असे कंपनीने स्पष्ट केले. याविषयी आयटी कंपनी कोफोर्जने ब्रिज फायनान्सिंग किंवा क्यूआयपी (Quality Institutional Placement QIP) द्वारे संबंधित कंपनीचे कर्ज फेडण्याची योजना आखत असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. यासह अधिग्रहणात उपलब्ध माहितीनुसार, ५५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज कोफोर्ज ब्रिज फायनान्सिंग किंवा क्यूआयपी (QIP) द्वारे फेडण्याचीही योजना आखत आहे.या संपूर्ण  करारामध्ये, एडव्हेंट इंटरनॅशनल आणि वॉरबर्ग पिंकस यांच्यासह विक्रेते कोफोर्जमध्ये ९.३८ कोटी शेअर्ससह सामील होतील. सध्या या शेअरची किंमत उपलब्ध माहितीनुसार १८१५ प्रति शेअर आहे. ही किंमत एक्सचेंजवरील संबंधित दिवसाच्या १६७३ रूपयांच्या पातळीच्या बंद भावापेक्षा ८.५% अधिक प्रिमियम दरात आहे.


कंपनीला या अधिग्रहणानंतर आर्थिक वर्ष २६ मध्ये सुमारे ६०० दशलक्ष डॉलर्स वाढीव महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २३ ते आर्थिक वर्ष २६ या काळात सुमारे १३% सीएजीआरने (Compound Annual Growth Rate CAGR) महसूल वाढेल आणि समायोजित एबिटडा मार्जिन (Adjusted EBITDA Margin) १९% पातळीच्या जवळपास असेल असे कंपनीला वाटते दरम्यान अधिग्रहणांनंतर, एकत्रित कंपनी सुमारे १४% एबिट मार्जिनवर कार्यरत राहण्याची अपेक्षा कंपनीने गुंतवणूकदारांच्या बैठकीत व्यक्त केली जात. यासह कोफोर्ज व्यवस्थापनाने कालांतराने प्रति शेअर उत्पन्नात (EPS) वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.


या अधिग्रहणामुळे कोफोर्जला २.५ अब्ज डॉलर्सची तंत्रज्ञान सेवा कंपनी बनण्यास मदत होईल, ज्यामध्ये ए आय संबंधित अभियांत्रिकी, डेटा आणि क्लाउड सेवा व्यवसायांचा समावेश असेल. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये २ अब्ज डॉलर्स महसूल मिळवण्याची शक्यता कंपनीला वाटते‌. या अधिग्रहणामुळे कोफोर्जच्या हायटेक आणि आरोग्यसेवा आयटी क्षेत्रातील पोर्टफोलिओत वाढ होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. सध्या कोफोर्जची २५ देशांमध्ये ३३ जागतिक वितरण (Distribution Network) केंद्रे आहेत.


शुक्रवारी संध्याकाळी करारानंतर गुंतवणूकदारांना संबोधित करताना, कोफोर्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक सुधीर सिंह यांनी सांगितले आहे की, एन्कोराच्या समावेशामुळे कोफोर्जला वाढीच्या पुढील टप्प्यात एक फायदा मिळेल, ज्यामध्ये एआय, डेटा आणि क्लाउड सेवांचे वर्चस्व असेल. एन्कोराची (ए आय नेटिव्ह) २०२६ साठी अंदाजित उलाढाल ६०० दशलक्ष डॉलर्स आहे. या कराराच्या घोषणेपूर्वी काल शुक्रवारी कोफोर्जचा शेअर दर ३.७% घसरून १६७३.२५ रुपयांवर बंद झाला होता.या वर्षी इयर टू डेट बेसिसवर (YTD) कंपनीचा शेअर १३% नी घसरला असून शेअर १ महिन्यात १०.५३% घसरला आहे. तर गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ९.२९% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Ahilyangar Crime : ‘पैसे अन् सोनं सिद्ध करून देतो’ म्हणत महिलेची 45 हजारांची फसवणूक, भोंदू साधू गजाआड

Ahilyangar Crime : ‘पैसे आणि सोन्याची अंगठी सिद्ध करून देतो’, असा बहाणा करत महिला व्यापाऱ्याची तब्बल 45 हजार रुपयांची फसवणूक