मोहित सोमण: इतिहासात प्रथमच चांदीने ७५ डॉलर प्रति औंसची पातळी पार केली असून सलग पाचव्या सत्रात चांदीच्या दरात तुफान वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही चांदीने प्रति किलो २४०००० पातळी गाठण्यास यश मिळवले आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना चांदीला आणखी मागणी वाढत असल्याने चांदीने आपल्या महाकाय रूप बाजाराला दाखवत असताना आजही वाढ नोंदवली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये एकाच सत्रात ४% सिल्वर फ्युचर निर्देशांकात वाढ नोंदवल्याने चांदीने २३२३७० रूपयांची पातळी पार केली आहे. जागतिक बाजारपेठेत तर दुपारी १ वाजेपर्यंत चांदीच्या निर्देशांकात ४.४४% वाढ झाल्याने चांदी ७५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. १ वर्षात १४०% पेक्षा अधिक पातळीवर वाढलेली चांदी केवळ १ महिन्यात ३९.६६% उसळली असून एक आठवड्यातच १०.९३% जगभरात उसळली होती.
जगभरातल सोने, चांदी, प्लॅटिनम यासह इतर धातूंच्या दरातही मोठ्या प्रमाणात वर्षाच्या अखेरीस रॅली होत आहे. भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आजही चांदीला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त झाले आहे. डॉलरच्या निर्देशांकात सुरू असलेल्या घसरणीसह डॉलरवर वाढत्या दबावामुळे लोकांनी ईपीएफसह चांदीच्या गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवली आहे. पुरवठ्यापेक्षा वाढलेली मागणी लक्षात घेता आणखी चांदी महागण्याची शक्यता कायम आहे. दरम्यान प्राईज करेक्शन पूर्वी चांदीत किती वाढ होते ते येणार काळ ठरवील दरम्यान यांचा परिणाम आशियाई बाजारासह भारतीय बाजारातही कायम राहणार आहे.
युएस व व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व आणखी वाढलेले असताना भूराजकीय घडामोडी हे या हालचालीमागील एक प्रमुख कारण होते. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीवर दबाव वाढवल्यानंतर सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीत वाढ होतच आहे. पुरवठ्यात व्यत्यय आणि व्यापक प्रादेशिक अस्थिरतेबद्दल चिंता गुंतवणूकदारांची वाढल्याने चांदीने आज मोठी पातळी गाठली असून चांदीने ५२ आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर (All time High) मार्गक्रमण सुरु केले आहे.
यासह तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी मजबूत असूनही युएस फेडदरात कपात होईल असा आशावाद युएस बाजारात कायम आहे.अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत पोहोचली आहे. गुंतवणूकदारांना अशीही आशा आहे की, नवे फेडरल रिझर्व्हचे पुढील अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यापेक्षा अधिक उदारमतवादी भूमिका घेतील आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्याजकपातीच्या भूमिकेशी अधिक जुळवून घेतील. त्यामुळे अद्याप राजकीय पटलावरही अस्थिरता असल्याचाही परिणाम चांदीवर कायम होत आहे.
दरम्यान, बाजारातील अस्वस्थतेत भर घालत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले की, अमेरिकन सैन्याने नायजेरियातील दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत, ज्यामुळे वॉशिंग्टनची अनेक प्रदेशांमध्ये लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी सुरू झाल्यानंतरही अस्वस्थता आणखी बिकट वाढली.चांदीने सोन्याच्या वाढीचे अनुकरण केले, केवळ तिच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या आकर्षामुळेच नव्हे, तर विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि स्वच्छ-ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये तिच्या औद्योगिक वापरामुळेही तिला आज अधिक चालना मिळाली सुट्ट्यांमुळे व्यवहार कमी असलेल्या परिस्थितीत, मोठ्या गुंतवणुकीचा ओघ आणि मर्यादित उपलब्धतेमुळे किमतींमधील चढउतार अधिक तीव्र झाले असताना आणखी दबाव वाढल्याने चांदीने विक्रमी आकडा गाठला आहे.
गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतीय बाजारात चांदीच्या दरात प्रति ग्रॅम ६ रूपयांनी वाढल्या असून प्रति किलो दर ६००० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४० व प्रति किलो दर २४०००० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २४०० रूपये तर प्रति किलो दर २४०००० रूपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार, भारतीय बाजारात गेल्या २५ दिवसात चांदी ५२००० रुपयांनी वाढली असल्याचे दिसत आहे.