भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या (Vijay Hazare Trophy 2025-26) दुसऱ्या फेरीच्या निमित्ताने हे दोन्ही दिग्गज आज पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवाचा डोंगर पाठीशी असलेल्या या जोडीने पहिल्याच सामन्यात आपल्या फलंदाजीची धार सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या फेरीत दोघांनीही आक्रमक शतके झळकावून प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला होता. सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात २३७ धावांचे लक्ष्य समोर असताना 'हिटमॅन'ने आपल्या शैलीला साजेसा खेळ केला. त्याने एकट्याने १५५ धावांची खेळी साकारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीकडून खेळताना विराटने आंध्र प्रदेशविरुद्धच्या कठीण आव्हानाचा धैर्याने सामना केला. २९९ धावांचा पाठलाग करताना त्याने अवघ्या १०१ चेंडूंमध्ये १३१ धावांचा धमाका केला. त्याच्या या खेळीत १४ खणखणीत चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या धमाकेदार सुरुवातीनंतर, आजच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात हे दोन्ही स्टार फलंदाज पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाले असून संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष त्यांच्या बॅटिंगकडे लागून राहिले आहे.
अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणीवर ठाणे सिव्हिल ...
आज कोणाविरुद्ध आहे मुकाबला?
आज विराट कोहलीचा दिल्लीचा सामना गुजरातविरुद्ध होणार आहे. हा सामना बंगळुरूमधील बीसीसीआय 'सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१' वर खेळवला जाईल. रोहितचा मुंबई संघ जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर उत्तराखंडशी दोन हात करेल. दोन्ही सामने सकाळी ९:०० वाजता सुरू होतील, तर नाणेफेक सकाळी ८:३० वाजता होईल.
सामना लाईव्ह पाहता येणार का?
क्रिकेट चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी म्हणजे, रोहित आणि विराटचे आजचे सामने कोणत्याही टीव्ही चॅनेल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह दिसणार नाहीत. बीसीसीआयने केवळ अहमदाबाद आणि राजकोटमधील मैदानांवर प्रक्षेपणाची सोय केली आहे. मुंबई आणि दिल्लीचे सामने या ठिकाणी नसल्यामुळे चाहत्यांना केवळ स्कोअरबोर्ड अपडेट्सवर समाधान मानावे लागेल.
दुसऱ्या फेरीतील संपूर्ण सामन्यांची यादी-
ग्रुप ए-
मध्य प्रदेश विरुद्ध तामिळनाडू (सकाळी ९:००) - गुजरात कॉलेज ग्राउंड, अहमदाबाद
झारखंड विरुद्ध राजस्थान (सकाळी ९:००) - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पुदुच्चेरी विरुद्ध त्रिपुरा (सकाळी ९:००) - एडीएसए रेल्वे ग्राउंड, अहमदाबाद
कर्नाटक विरुद्ध केरळ (सकाळी ९:००) - नरेंद्र मोदी स्टेडियम ब, अहमदाबाद
ग्रुप बी-
चंदीगड विरुद्ध उत्तर प्रदेश (सकाळी ९:००) - सनोसरा ग्राउंड अ, राजकोट
आसाम विरुद्ध जम्मू आणि काश्मीर (सकाळी ९:००) - निरंजन शाह स्टेडियम, राजकोट
बडोदा विरुद्ध बंगाल (सकाळी ९:००) - निरंजन शाह स्टेडियम क, राजकोट
हैदराबाद विरुद्ध विदर्भ (सकाळी ९:००) - सनोसरा ग्राउंड ब, राजकोट
ग्रुप सी-
गोवा विरुद्ध हिमाचल प्रदेश (सकाळी ९:००) - जयपुरिया विद्यालय ग्राउंड, जयपूर
मुंबई विरुद्ध उत्तराखंड (सकाळी ९:००) - सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
छत्तीसगड विरुद्ध पंजाब (सकाळी ९:००) - अनंतम ग्राउंड, जयपूर
महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम (सकाळी ९:००) - केएल सैनी ग्राउंड, जयपूर
ग्रुप डी-
हरियाणा विरुद्ध सौराष्ट्र (सकाळी ९:००) - केएससीए ग्राउंड २, अलूर
आंध्र प्रदेश विरुद्ध रेल्वे (सकाळी ९:००) - केएससीए ग्राउंड, अलूर
ओडिशा विरुद्ध सर्व्हिसेस (सकाळी ९:००) - केएससीए ग्राउंड ३, अलूर
दिल्ली विरुद्ध गुजरात (सकाळी ९:००) - सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड १, बेंगळुरू
प्लेट ग्रुप-
बिहार विरुद्ध मणिपूर (सकाळी ९:००) - जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम, रांची
अरुणाचल प्रदेश विरुद्ध मिझोरम (सकाळी ९:००) - जेएससीए ओव्हल ग्राउंड, रांची
मेघालय विरुद्ध नागालँड (सकाळी ९:००) - उषा मार्टिन ग्राउंड, रांची