वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत
नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा रॉड्रिग्झ असल्याचे आता पाहायला मिळत आहे. कारण आपली खास मैत्रीण स्मृती मानधनाला ती वाईट काळामधून बाहेर काढायला गेल्या काही दिवसांपासून मदत करत आहे. सध्याच्या घडीला या दोघांचे सेलिब्रेशनचे खास फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत.
स्मृतीसाठी जेमिमाह बरेच काही करताना दिसत आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर जेमिमा ही थेट ऑस्ट्रेलियाला बिग बॅश लीग खेळायला गेली होती. बिग बॅशमध्ये तिची दमदार कामगिरी सुरू होती. पण त्याचवेळी स्मृतीचे लग्न होते. त्यामुळे स्मृतीच्या लग्नासाठी जेमिमा ही काही दिवसांची सुट्टी घेऊन भारतात आली होती आणि स्मृतीचे लग्न झाल्यावर ती पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाणार होती. पण स्मृतीचे लग्न होऊ शकले नाही. स्मृतीने सुरुवातीला लग्न पुढे ढकलले आणि त्यानंतर तिने आपले लग्न रद्द केले. स्मृती त्यावेळी निराश झाली होती. पण आपल्या मैत्रिणीला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायला हवे, यासाठी जेमिमाने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा परतण्याचा निर्णय रद्द केला आणि ती स्मृतीबरोबर राहिली. पण आता स्मृतीचा वाईट काळ सुरू आहे, तिला मोठा धक्का बसला आहे, तिला सावरण्यासाठी आणि यामधून बाहेर काढण्यासाठी चांगल्या मैत्रिणीची गरज आहे, हे जेव्हा जेमिमाला समजलं, तेव्हा तिने ऑस्ट्रेलियामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. जेमिमासाठी ही लीग महत्त्वाची होती, कारण पैसा, प्रसिद्धीबरोबरच तिला चांगला अनुभव मिळणार होता, पण मैत्रिणीसाठी आता तिने ही स्पर्धा न खेळता स्मृतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.आपल्या करीअरची काळजी न करता तिने फक्त स्मृतीचा विचार केला.
आता देखील जेमिमा पुन्हा एकदा स्मृतीला आनंदी कसे ठेवता येईल, याचा विचार करत आहे. मैत्री कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा रॉर्ड्रिग्जने कृतीतून दिले आहे.
भारतीय संघ सध्या श्रीलंकेबरोबर टी-२० सामने खेळत आहे. पण यावेळी वेळात वेळ काढून जेमिमा स्मृतीला ख्रिसमस सेलिब्रेशनला घेऊन गेली. यावेळी स्मृतीचा चेहरा चांगलाच खुलला होता. स्मृती यावेळी या क्षणांचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळाले. स्मृती आणि जेमिमा यांचा जो फोटो आहे, यावरून हा आनंद सर्वां समजता येऊ शकतो. चाहत्यांनाही हा फोटो आवडला असून त्यामुळेच तो जोरदार व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
स्मृती आपला वाईट काळ विसरून आता क्रिकेटच्या मैदानात परतली आहे. त्यामुळे आता स्मृती पुन्हा क्रिकेटचे मैदान कसे गाजवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणर आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात स्मृती किती धावा करता, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.