Friday, December 26, 2025

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका स्कॉर्पिओची डीएसपींना धडक बसली. रिव्हर्स करत असताना चालकाने मागे नीट बघितले नाही. डीएसपी रस्त्यावर उभे राहून परिसरातील व्यवस्थेचा आढावा घेत होते, त्याचवेळी रिव्हर्स करत असताना चालकाने डीएसपींना धडक दिली. उपस्थित इतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्कॉर्पिओच्या चालकाला हात दाखवून लगेच थांबवले. डीएसपींनी स्वतःला चटकन सावरले. वेळेत स्कॉर्पिओ थांबली नसती आणि स्वतःला सावरणे जमले नसते तर डीएसपींना गंभीर दुखापत होण्याचा धोका होता.

मुख्यमंत्री नितीश कुमार दहावे शीख गुरु श्री गुरु गोविंद सिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते, त्यावेळी ही दुर्घटना झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार दिदारगंजच्या बाजार समितीतील प्रकाश पुंजजवळील वॉचटॉवरची पाहणी करत होते. तर ड्युटीवर असलेले वाहतूक विभागाचे डीएसपी परिसरातील व्यवस्थेचा आढावा घेत होते, त्याचवेळी रिव्हर्स घेत असलेल्या स्कॉर्पिओ चालकाने गडबड केली. चालकाने मागे न बघताच रिव्हर्स करण्याची चूक केली आणि स्कॉर्पिओची डीएसपींना धडक बसली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment