Friday, December 26, 2025

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने शुक्रवारी २६ डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ०४० अर्जांचे वितरण करण्‍यात आले आहे. तर, अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळी, आणि गीता गवळी यांच्याश ०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केला.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना उमेदवारी पत्रे देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी एकूण ४ हजार १६५ उमेदवारी अर्जांचे तर, बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ८४४ उमेदवारी अर्जांचे वितरण झाले होते. तसेच, ०२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाली होते.

उमेदवारी अर्ज वितरणाच्या तिस-या दिवशी म्‍हणजे आज २६ डिसेंबर २०२५ रोजी २ हजार ०४० उमेदवारी अर्जांची वितरण झाले आहे. तर, ०७ उमेदवारी पत्र दाखल झाली आहेत. यामध्ये भायखळा विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०७ मधून योगिता गवळी आणि प्रभाग क्रमांक२१२ मधून माजी नगरसेविका गीता गवळी यांनी अखिल भारतीय पक्षाच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्याच इतर०७ जणांनी आपले अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज स्‍वीकारण्‍याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या दरम्‍यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. त्‍यानुसार, आजपर्यंत एकूण मिळून ९ जणांनी आपले अर्ज सादर केले.

Comments
Add Comment