पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५) व्यावसायिक विमान वाहतूक सुरू झाली आहे. सकाळी बंगळुरू येथून पहिले विमान नवी मुंबई विमानतळावर आले. या विमानाचे वॉटर कॅननद्वारे सलामी देऊन अर्थात पाण्याच्या तोरणाने स्वागत करण्यात आले. बंगळुरूहून इंडिगोच्या विमानाने नवी मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांच्या स्वागताला विमानतळाचे निर्माते असलेले उद्योजक गौतम अदानी स्वतः उपस्थित होते.
पहिल्या विमानाच्या आगमनाआधी अदानी समुहाने एक सोशल मीडिया पोस्ट केली. 'भारतीय विमान वाहतुकीसाठी एक नवीन युग आकार घेत आहे. अनेक वर्षांच्या नियोजन आणि अंमलबजावणीनंतर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यांच्या पहिल्या उड्डाणाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. अंतिम टप्प्यात दरवर्षी ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यासाठी बांधलेले, एनएमआयए केवळ मुंबईसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी नवीन शक्यता उघडण्यासाठी सज्ज आहे.' ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर झाली. यानंतर नियोजनाप्रमाणे 6E460 हे विमान सकाळी आठ वाजता आले. या निमित्ताने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केक कापून आणि नारळ फोडून आनंद साजरा केला. यानंतर सकाळी ८.४० वाजता नवी मुंबई येथून हैदराबादसाठी 6E882 या इंडिगोच्या विमानाने उड्डाण केले. सोशल मीडियावर रिअल टाईम अपडेट देत अदानी समुहाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याची आनंदवार्ता दिली.
नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे नवी ...
सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत अर्थात पीपीपी मॉडेल वापरुन अदानी समूह आणि सिडको यांनी संयुक्तपणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला आहे. या विमानतळामुळे ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. आता त्यांना विमान प्रवासाकरिता मुंबई आणि नवी मुंबई असे विमानतळांचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मुंबईत राहणाऱ्यांनाही नवी मुंबई विमानतळावरुन अटल सेतूमार्गे घर गाठणे शक्य आहे. पुण्याच्या विमानतळावरुन सध्या मर्यादीत उड्डाणे होतात. पण लवकरच पुणे शहराजवळ पुरंदर येथे एक विमानतळ उभारला जाणार आहे. या विमानतळामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना विमान प्रवासाकरिता नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. वेळेची बचत करणे त्यांनाही शक्य होणार आहे.
‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था कोलमडली, तेव्हा हजारो प्रवाशांना ...
असे उभे रहिले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिडकोने १९९७ मध्ये पहिल्यांदा नवी मुंबई विमानतळ ही संकल्पना सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये या विमानतळाची पायाभरणी केली. या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले.
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेडने २०२१ पासून नवी मुंबई ग्रीनफिल्ड विमानतळाच्या विकास, बांधकाम आणि ऑपरेशनल तयारीचे नेतृत्व केले आहे. भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या रचनेत नवी मुंबई विमानतळाची बांधणी करण्यात आली आहे. नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय टर्मिनल वास्तुकला, एकात्मिक सांस्कृतिक ओळख, समकालीन डिझाइन आणि शाश्वत वैशिष्ट्यांनी प्रेरित आहे. कोविड संकटाचा मुकाबला करत अवघ्या आठ वर्षात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. या विकासामुळे विद्यमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी होईल आणि एमएमआरमधील क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल अशी अपेक्षा आहे.