अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते धर्म ध्वज स्थापन करण्यात आला. या दिवसानंतर राम मंदिर परिसर अधिक भव्य आणि आकर्षक झाल्याने दररोज लाखो भाविक अयोध्येत रामललाचे दर्शन करण्यासाठी येतात. तर दुसरीकडे ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळेही भाविकांनी राम मंदिर दर्शनाचे नियोजन केले होते. मात्र तिथीनुसार ३१ डिसेंबरला राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याने मंदिर दर्शनासाठी बंद राहणार की खुले असणार याबाबत भाविकांना प्रश्न पडला होता. ज्यावर मंदिर संस्थानाने उत्तर दिले आहे.


२२ जानेवारी २०२४ रोजी पौष शुक्ल द्वादशी तिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामललाची प्राणप्रतिष्ठा करून राम मंदिराचे लोकार्पण केले होते. यंदा हा दिवस ३१ डिसेंबर २०२५ रोजी येत आहे.त्यामुळे तिथीनुसार राम मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अयोध्येत पुन्हा एकदा पाच दिवसांचे सांस्कृतिक आणि धार्मिक विधी होत आहेत. २८ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ पर्यंत राम मंदिराचा दुसरा वर्धापन साजरा केला जाणार आहे. या आनंदात भाविकांनाही सामावून घेण्यासाठी मंदिर संस्थानाने दर्शनासाठी राम मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.




अयोध्येत प्राणप्रतिष्ठा द्वादशीनिमित्त राम मंदिर परिसरात पाच दिवसांचा सांस्कृतिक आणि धार्मिक विधी होणार आहे. हा कार्यक्रम राम मंदिरातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी म्हणजेच अंगद टीला येथे होणार आहेत. सामान्य रामभक्तही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच ३१ डिसेंबर रोजी राम मंदिर आणि श्रीरामांचा दरबार नेहमीप्रमाणे रामभक्तांच्या दर्शनासाठी खुला राहणार असून भाविकांना ३१ तारखेला रामललाची विशेष पूजा आणि आरास पाहायला मिळणार आहे. राम मंदिर ट्रस्टने यासाठी व्यापक तयारी केली आहे.


गेल्या वर्षी प्रतिष्ठा द्वादशीचा दिवस ११ जानेवारी रोजी होता. यावर्षी हा दिवस ३१ डिसेंबर रोजी आहे. या खास दिवसानिमित्त मंदिरात सकाळी ९.३० वाजता विशेष पूजन होणार आहे. तर जे भाविक अयोध्येत येऊ शकत नसतील, त्यांना हा मंगल सोहळा घरातून पाहण्यासाठी राम मंदिर ट्रस्टने दूरदर्शनला या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी दिली आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च