संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?


नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे एक मोठा ट्विस्ट आला आहे.


संजय कपूर यांनी एकूण तीन वेळा लग्न केले. पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महातानिशीशी केले. काही काळानंतर घटस्फोट घेतला आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न केले. या लग्नानंतर त्याला समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा झाला. नंतर २०१४ मध्ये करिश्मा आणि संजय यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. त्यांना अझारियस हा मुलगा झाला. संजयने प्रिया सचदेवचा पहिला पती विक्रम चटवालपासून झालेली मुलगी सफिरा चटवाल हिलाही दत्तक घेतलं. यानंतर काही काळाने संजय मृत्यू झाला. संजयच्या पश्चात त्याच्या संपत्तीवरुन वाद सुरू झाला आहे.



काय आहे वाद ?


संजय आणि करिश्माच्या मुलांनी म्हणजेच समायरा आणि कियानने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे. करिश्माच्या मुलांनी दावा केला की त्यांचे वडील संजय कपूर यांचं मृत्यूपत्र बनावट आहे, ते जिवंत असतानाच त्यात छेडछाड करण्यात आली होती आणि बदल करण्यात आले होते. गेल्या सुनावणीत वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला की, संजय त्यांच्या मुलांसोबत सुट्टीवर असताना मृत्यूपत्र बदलण्यात आलं होतं. मृत्यूपत्रात सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला संजय कपूरच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर लगेच कंपनीचा संचालक बनवण्यात आलं.


संजयची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी मृत्यूपत्रात बदल केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे. आता समायरा आणि कियानने मृत्यूपत्राच्या फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे. समायरा आणि कियानच्या दाव्यानुसार संजय कपूर यांनी त्यांना मालमत्तेत हक्क देणार असल्याचे सांगितले होते. पण न्यायालयापुढे आलेल्या मृत्यूपत्रात उल्लेखच दिसत नाही. यामुळे प्रियाने संजयच्या मृत्यूपत्रात छेडछाड करुन स्वार्थ साधल्याचा आरोप समायरा आणि कियानने केला आहे.


फॉरेन्सिक तपासणीच्या मागणीला प्रियाच्या वकिलाने विरोध केला आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे पुढील सुनावणीत काय होणार ? दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय किंवा निर्देश देणार याकडे संजय कपूरच्या नातलगांचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे