बीड : बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह अन्य आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले. आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम वाचून दाखवला. सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती न्यायालयात दिली. यादरम्यान न्यायधीशांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह अन्य आरोपींना एक प्रश्न विचारला. यावेळी न्यायालयात नेमके काय घडले, याची माहिती समोर आली आहे. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता.