मुंबईसाठी नरेंद्र मोदी , अमित शहा यांच्यात तोफा धडाडणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याची सत्ता मिळवल्यानंतर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.


१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजपचे हे दोन्ही सर्वोच्च नेते मुंबईत प्रचाराचा धडाका लावणार आहेत. ७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार असून, मुलुंडसह दोन महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा पार पडतील. ११ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या सभेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १२ जानेवारी रोजी सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील मुंबईत असणार असून, ते पदयात्रा किंवा जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे.


पुण्यातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीत काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘युद्ध, प्रेम आणि निवडणुकीत सगळे माफ असते’, असे मिश्किल विधान करत, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व काही फेअर असल्याचे सुचित केले आहे.


मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - मनसे विरूद्ध भाजप - शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रमुख लढत असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व काँग्रेस हे वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे. उबाठा गटासाठी व मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. जर मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली तर तिथून त्यांना बाऊन्स बॅक करणे खूप जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीत आपला सगळा जोर लावण्याची शक्यता आहे. या हायव्होल्टेज प्रचार दौऱ्यांमुळे ही निवडणूक अटीतटीची व ऐतिहासिक ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Ahilyanagar Crime : संतापजनक ! धावत्या एसटीत गुंडाची महिलेवर लघुशंका, पुढे...

Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे एका तळीराम गुंडाने माणुसकीची हद्द पार

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या

Nashik : नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची भरती

Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत (Department of Tribal Development) कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला