सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि महत्त्व जिवंत केल्याचे पहायला मिळत आहे. प्रसिद्ध समाजसेवक हुसैन मनसुरीसोबत जॅकलिनने मुंबईच्या रस्त्यांवर राहणाऱ्या वंचित मुलांमध्ये आनंद पसरवला. ज्यासाठी ती सांताक्लॉजच्या पोशाखात वस्तीतील मुलांसोबत सणाचा आनंद वाटताना दिसली. या कृतीमुळे जॅकलिन मधील प्रेमळपणा आणि मानवतावादी गुण दिसले.





या खास क्षणाचा व्हिडिओ जॅकलिनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. ज्यात ती सांताक्लॉजच्या पोशाखात दिसत असून मुंबईतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना खाऊ आणि खेळण्यांच्या स्वरुपातील भेटवस्तू देत आहे. तिच्या या कृतीमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी तिच्या या कृतीवर सकारात्मक कॉमेंट्स केल्या आहेत. सिनेसृष्टीच्या ग्लॅमर व्यतिरिक्त जॅकलिनचे हे आनंद पसरवण्याचे काम चाहत्यांनी उल्लेखनीय दर्जाचे ठरवले आहे. दरम्यान, देशभरातील सेलिब्रिटी त्यांच्या पद्धतीने ख्रिसमस साजरा करत असताना, जॅकलिन फर्नांडिसची ही कृती साधेपणा आणि प्रामाणिकपणासाठी वेगळी ठरली आहे.



दरम्यान, या कृतीने पुन्हा एकदा जॅकलिनचा सामाजिक उपक्रमांशी असलेला दीर्घकाळचा संबंध आणि सामाजिक कार्यांप्रती असलेली तिची वचनबद्धता प्रतिबिंबित होते. गेल्या काही वर्षांत, अभिनेत्रीने विविध मानवतावादी उपक्रमांना, विशेषतः लहान मुलं, शिक्षण आणि प्राण्यांविषयक संवेदनशील विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्यांना सक्रियपणे पाठिंबा दिला आहे.


जॅकलिन फर्नांडीस ही श्रीलंकेची अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत सध्याच्या घडीला स्टार बनली आहे. कीक, हाऊसफूल आणि मर्डरसारख्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरस भूमिकांसाठी ती ओळखली जाते . २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंका जिंकल्यानंतर तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. बहरीनमध्ये एका बहु-वंशीय कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टेलिव्हिजनमध्ये सुरुवात करत स्वतःची एक यशस्वी, लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

Comments
Add Comment

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत

लाडकी काव्या म्हणजेच ज्ञानदाची लगीनघाई सुरु; हातावर रंगली त्याच्या नावाची मेहंदी

मुंबई : लग्नाचा हंगाम जोरदार सुरु आहे. बरेच सेलिब्रिटी मंडळी या वर्षी विवाह बंधनात अडकली तर काही लवकरच लग्न करणार

दोनच चित्रपटांत १२०० कोटी; आदित्य धरचा थक्क करणारा प्रवास

मुंबई : ‘धुरंधर’ या चित्रपटाने आदित्य धर यांना बॉलीवूडमधील खरा धुरंधर ठरवले आहे. सध्या चर्चेत असलेल्या