नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड 


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून आणि पालापाचोळ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत व राज्य-नोंदणीकृत ब्रॅण्ड “हरित महासिटी कंपोस्ट” लाभला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तुर्भे क्षेपणभूमी येथील प्रकल्पात दररोज ३०-४० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते.


हा ब्रॅण्ड गुणवत्तापरक आणि पर्यावरणपूरक मानकांचे पालन करतो, तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणाऱ्या मुंबई शहराला आणखी एक विशेष मानांकन लाभले आहे. "हरित महासिटी कंपोस्ट”हा ब्रॅण्ड महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकाराने शहरी ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा प्रचार व विपणन करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे.


हा ब्रॅण्ड राज्य कचरा व्यवस्थापन नियम तसेच खत नियंत्रण आदेश (एफसीओ) अंतर्गत निर्धारित केलेल्या गुणवत्ता मानकांचे काटेकोरपणे पालन करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी निर्माण होणारे सेंद्रिय खत त्या गुणवत्तेचे ठरले आहे.


या सेंद्रिय खताचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये केला जात आहे. तसेच हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्ण खताचा लाभ होत आहे.


महापालिकेच्या या पुढाकारामुळे केवळ कचऱ्याची मात्रा कमी होत नाही, तर मातीची सुपिकता वाढते आणि शाश्वत शेतीला चालना मिळते. “हरित महासिटी कंपोस्ट” ब्रॅण्डमुळे नवी मुंबई महानगरपालिका आता पर्यावरण संवर्धन व कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आणखी एक मानांकन प्राप्त करत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या

दुर्दैवी! वाढदिवशी चिमुकली स्वत:लाच घेऊ लागली चावा,५ वर्षीय निशाचा करुण अंत

दिवा : दिवा येथे घराबाहेर खेळताना कुत्रा चावलेल्या पाच वर्षांच्या बालिकेची महिनाभर सुरु असलेली मृत्यूशी झुंज

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाय-फाय सुविधा

१० एमबीपीएसपर्यंत स्पीड; 'अदानी वन ॲप'द्वारे माहिती एका क्लिकवर नवी मुंबई : अदानी ग्रुपचा नवी मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नवी मुंबई अध्यक्षपदी भरत जाधव

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नवी मुंबई शहराध्यक्षपदी भरत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे दोन्ही बालेकिल्ले भाजपने कसे उद्ध्वस्त केले

रवींद्र चव्हाण, किसन कथोरे यांचे यशस्वी नेतृत्व ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या