BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ८४४ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्‍यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसात सुमारे ७ हजार उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी अर्ज भरण्याचा श्री गणेशा झाला आहे आणि बुधवारी ०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.


मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी, पहिल्‍या दिवशी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण मिळून ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण झाले होते. तर दुस-या दिवशी म्‍हणजे बुधवारी, एकूण २ हजार ८४४ नामनिर्देशन पत्रे वितरित झाली आहेत. दुसऱ्या दिवशी घाटकोपर आणि अंधेरी भागातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या, गुरूवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी नाताळ निमित्‍त सार्वजनिक सुटी असल्‍याने नामनिर्देशन पत्रे दिली जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज स्‍वीकारण्‍याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या दरम्‍यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ०५ पर्यंत आहे.



उमेदवारी अर्ज विक्री आणि कंसात भरलेले अर्ज


ए + बी +ई विभाग - १०९
सी + डी विभाग - ५६
एफ उत्‍तर विभाग - ९८
एफ दक्षिण विभाग - ८३
जी उत्‍तर विभाग - २८६
जी दक्षिण विभाग - ५२
एल विभाग (RO-16) - १११
एल विभाग (RO-17) - ७८
एम पूर्व विभाग - ३४०
एम पश्चिम - १७४
एन विभाग - ७७/(१ प्राप्‍त)
एस विभााग - १०६
टी विभाग - ९७
एच पूर्व विभाग - ९४
एच पश्चिम विभाग - १४६
के पश्चिम विभाग - १९३
के पूर्व + के पश्चिम विभाग - २३२/(१ प्राप्‍त)
पी दक्षिण विभाग - ७१
पी उत्‍तर विभाग - १२०
पी पूर्व विभाग - १२८
आर दक्षिण विभाग - ९०
आर मध्‍य विभाग - ६०
आर उत्‍तर विभाग - ४३
एकूण - २८४४

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री