रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे खोबरं.खोबऱ्याशिवाय जेवण हे अपुरेच.पालेभाजीत किंवा फळभाजीत बनवल्यानंतर त्यात सुकं किंवा ओल खोबर किसून टाकले, भाजीची चव वाढते एवढेच नाही तर, पोह्यावरहही खोबर किसून टाकले जात .त्यामुळे पोह्यांना एक वेगळीच चव प्राप्त होते .ओल्या खोबऱ्यासोबतच सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर केला जातो. सुक्या खोबऱ्यापासून वाटप बनवले जाते. खोबर खाल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि आतड्यांचे कार्य सुरळीत राहते.
कोकणात मोठ्या प्रमाणात खोबऱ्याचा वापर केला जातो .आणि प्रत्येक पदार्थंमध्ये ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा समावेश असतो .सुक्या खोबऱ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.यामध्ये प्रथिने, फायबर, सेलेनियम, तांबे, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळून येतात.सुके खोबरे हे हदय,मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.नारळात हेल्दी फॅट असते,ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसते आणि सेलेनियम, फायबर, कॉपर आणि मँगनीजचे प्रमाण देखील अधिक असते.या सर्वांचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
हिमोग्लोबिनची पातळी वाढते:
हिमोग्लोबिनची पातळी जर वाढवायची असेल तर रोज खावा एक खोबऱ्याचा तुकडा .अॅनिमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात सुक्या नारळाचा समावेश करू शकता.सकाळी उठल्यानंतर सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा चावून खाल्ल्यास महिनाभरात रक्ताची पातळी भरून निघेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते:
सुक्या खोबऱ्यामध्ये लोह खूप जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे याच्या सेवनाने लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून हे पोषक घटक विषाणूजन्य रोगांपासून शरीराचे रक्षण होते.अनेक पोषक घटक शरीराला मिळतात.सुक्या खोबऱ्याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
संधिवाताचा धोका कमी:
आहारात नारळाचा समावेश केल्याने संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो.आपली स्मरणशक्ती वाढते.मानसिक आरोग्यासाठी खोबरे महत्वाचे आहे.यामध्ये असलेले सेलेनियम हे एक प्रकारचे खनिज आहे जे शरीराला एंजाइम तयार करण्यास मदत करते.त्यामुळे आपण निरोगी राहतो .
सुक्या खोबऱ्यामध्ये असलेले तांबे ऊर्जा पातळीला समर्थन देते. तसेच लाल रक्तपेशी आणि कोलेजन तयार होण्यास मदत होते.रक्तदाब आणि हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी शरीराला फायबरची गरज असते.वाळलेल्या खोबऱ्यामध्ये फायबर जास्तप्रमाणात असते त्यामुळे स्ट्रोक मधुमेह उच्च रक्तदाबाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.






