Tuesday, December 23, 2025

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाय-फाय सुविधा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाय-फाय सुविधा

१० एमबीपीएसपर्यंत स्पीड; 'अदानी वन ॲप'द्वारे माहिती एका क्लिकवर

नवी मुंबई : अदानी ग्रुपचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयएएल) २५ डिसेंबर रोजी डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनसह कार्यान्वित होईल. प्रवाशांना १० एमबीपीएस पर्यंत स्पीडचे मोफत हाय-स्पीड वाय-फाय आणि 'अदानी वन ॲप' मिळेल, जे रियल-टाइम अपडेट्स आणि सुविधांच्या माहितीसाठी व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करेल. ₹१९ हजार ६५० कोटींच्या सुरुवातीच्या खर्चात उभारलेला हे विमानतळ, सुरुवातीला दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची क्षमता हाताळेल. एनएमआयएएल ने 'मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुसरून, स्वदेशी ४जी/५जी-रेडी मोबाईल सेवांसाठी सरकारी मालकीच्या बीएसएनएलसोबत भागीदारी केली आहे.

प्रवाशांना प्रत्येक टचपॉईंटवर डिजिटल सुविधा उपलब्ध होईल, ज्यामुळे फिजिकल इन्फॉर्मेशन काउंटरवरील अवलंबित्व कमी होईल. मेसेजिंग, डिजिटल पेमेंट, ॲप-आधारित कॅब बुकिंग, स्ट्रीमिंग व व्हिडिओ कॉल्ससाठी स्थिर नेटवर्क सुनिश्चित केले आहे. एनएमआयएएलची टप्प्याटप्प्याने क्षमता वाढवण्याची योजना आहे, सुरुवातीला २० दशलक्ष, नंतर ९० दशलक्ष प्रवाशांपर्यंत.

या प्रकल्पाचा उद्देश मुंबईतील हवाई वाहतुकीच्या वाढत्या मागणीला पूरक सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रवाशांना आधुनिक डिजिटल अनुभव देणे आहे. विमानतळ अधिकारी सर्व डिजिटल सेवा व ऑपरेशनल सिस्टम्स पूर्णपणे कार्यक्षम असल्याची खात्री करून २५ डिसेंबरच्या उद्घाटनासाठी सज्ज आहेत.

Comments
Add Comment