राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नवी मुंबई अध्यक्षपदी भरत जाधव

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नवी मुंबई शहराध्यक्षपदी भरत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष नामदेव भगत यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्या जागी भाजपपासून काही काळ दूर असलेले भरत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. जाधव हे नवी मुंबई महापालिकेत भाजपचे खाते उघडणारे पहिले नगरसेवक म्हणून ओळखले जातात. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना, २००५ मध्ये जाधव भाजपकडून सभागृहात निवडून गेले होते. त्यानंतर राजकीय प्रवासात अनेक स्थित्यंतरं झाली.


गणेश नाईक यांच्या पक्षांतरानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचा दबदबा पूर्वीसारखा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत नामदेव भगत यांच्या जाण्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भरत जाधव यांची थेट अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


वडील-मुलगी एकाच पक्षात:


ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच पक्षप्रवेश सोहळा रविवारी (ता. २१) ऐरोली येथे पार झाला. या वेळी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, त्यांच्या पत्नी इंदुमती भगत, माजी नगरसेविका तनुजा मढवी यांच्यासह शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या नवी मुंबई अध्यक्ष पूनम पाटील यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर भगत यांनीही पदाचा राजीनामा देत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी  एकूण ७,१७,१०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण ५२.११% मतदान !

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी दि.15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९,१७,१२३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; एकूण ५५.५९ टक्के टक्के मतदान

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत

ठाण्यात सुमारे ५५ टक्के मतदान

मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३०