मुंबई : राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या ताकदीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मुंबई आयकर विभागाने २४x७ कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मुक्त व निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची शुचिता कायम राखण्याच्या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष आयकर विभागाच्या निवडणूक निरीक्षण यंत्रणेचा एक भाग म्हणून कार्य करेल आणि आदर्श आचारसंहिता लागू असलेल्या संपूर्ण कालावधीत कार्यरत राहील.
हा नियंत्रण कक्ष राज्यातील जागरूक नागरिक व रहिवाशांना निवडणूक प्रचारादरम्यान बेहिशेबी रोख रक्कम, मौल्यवान वस्तू किंवा इतर प्रलोभनांच्या वापराबाबत माहिती देऊन सावधान करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. नागरिक व्हॉट्सॲप, मोबाईल संदेश किंवा दूरध्वनीद्वारे ७७३८११३७५८ या क्रमांकावर अथवा mumbai.addldit.inv8@incometax.gov.in या ई-मेल पत्त्यावर माहिती पाठवू शकतात. हा नियंत्रण कक्ष, कक्ष क्रमांक ३१६, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई इथे आहे.