अलिबागमध्ये शेकापला रोखण्यात भाजप, शिवसेना अपयशी

उबाठाचे दोन शिलेदार विजयी, भाजपाला एकच जागा


सुभाष म्हात्रे अलिबाग : अलिबाग नगर परिषदेत महाविकास आघाडीतील शेकापच्या अक्षया प्रशांत नाईक निर्विवाद बहुमताने निवडून आल्या आणि शेकापने त्यांचे वर्चस्व कायम राखले असले, तरी नगरपालिका निवडणुकीत उमेदवार शोधावा लागणाऱ्या भाजपने देखील यावेळी पालिकेमध्ये एक उमेदवार रूपाने शिरकाव केला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीमधील उबाठाला हलके घेणाऱ्या शेकापला देखील त्यांच्याच श्रीबाग प्रभागातील बालेकिल्ल्यात दणका मिळाला असून, शेकापक्षाचे पालिकेतील दोन सदस्य कमी झाले असल्याचे चित्र अलिबाग नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर दिसून आले.


अलिबाग नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा चुरशीचा सामना झाला. या सामन्यात यावेळीही शेकापच बाजी मारेल असा अलिबागेत राजकीय वर्तुळात सुरवातीपासूनच अंदाज बांधला जात होता. हा अंदाज खरीही ठरला. पण तीन जागा गेल्याचे दु:ख शेकापला नक्कीच झाले आहे. यावेळी आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने शेकापक्षाकडे दोन जागा मागितल्या होत्या, मात्र त्या देण्यास शेकापक्ष तयार झाला नाही. त्यामुळे शिवसेना उबाठाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.


यामध्ये ठाकरे गटाच्या श्वेता पालकर आणि संदीप पालकर हे दांपत्य निवडून आले. महायुतीमधील भाजपचे एकमेव अॅड. अंकित बंगेरा हेही निवडून आल्याने पालिकेच्या शेकापच्या निरंकुश सत्तेवर नियंत्रण ठेवणारे तीन सदस्य पलिका सभागृहात विरोधी बाकावर दाखल झाले आहेत. अलिबाग नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या निवडीत आघाडीच्या शेकापक्षाला १६, काँग्रेस १, शिवसेना उबाठा २, तर भाजपला १ जागांवर यश मिळाले आहे. सकाळपासून महाविकास आघाडीमधील शेकापक्षाचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्र परिसरात दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये शेकापक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार याचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता, तसेच बहुसंख्य उमेदवार शेकापक्षाचे निवडून येतील ही खात्री देखील त्यांना होती.


जसजसा निकाल बाहेर येत राहिला. त्याप्रमाणे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला भंडारा उधळून आपला आनंद व्यक्त केला. शेकापचे राज्याचे चिटणीस जयंत पाटील यांना सर्वच्या सर्व उमेदवार निवडून यावेत असे वाटत होते. मात्र शेकाप-काँग्रेस आघाडीचे तीन उमेदवार पराभूत झाले. तीन उमेदवार पराभूत होण्याने शेकापला एकप्रकारे धक्काच बसला असून, ज्या तीन जागा गेल्या त्या शेकापक्षाला अपेक्षित नव्हत्या. हे उमेदवार पराभूत होण्यामागे नेमकी काय कारणे होती. याबाबत आत्मपरिक्षण पक्षाच्या बैठकीत होणार असल्याचे शेकापचे राज्याचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आजच्या पक्षाच्या कार्यक्रमात सांगताना या निवडणुकीत ८२ टक्के मते मिळाली असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील निवडणुकीत गेलेल्या जागा शेकापकडे कशा परत येतील यासाठी त्या दृष्टीने शेकाप काम करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


अलिबाग नगरपालिकेत वकिलांची संख्या वाढली


अलिबाग नगरपालिकेत २० सदस्यांपैकी निवडून आलेले सात सदस्य हे व्यवसायाने वकील आहेत. यामध्ये अॅड. मानसी म्हात्रे, अॅड. अंकित बंगेरा, अॅड . नीलिमा हजारे, अॅड. निवेदिता वाघमारे, अॅड ऋषिकेश माळी, अॅड. संदीप पालकर व अॅड. श्वेता पालकर या विजयी सदस्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

रोहा नगर परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी

रोहा : स्वराज्य स्थानिक निवडणुकीमध्ये २ डिसेंबर रोजी रोहा नगर परिषदेच्या हद्दीत मतदान घेण्यात आले. त्याची

महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा

नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील कविस्कर महाड : रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित, खा. सुनील तटकरे व भरत गोगावले

ओंबळी येथे आपत्ती निवारा शेड उभारणार

पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी गावात आपत्ती निवारा शेडच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ मंत्री भरतशेठ गोगावले

शेकाप नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

माणगाव : माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे शेकापचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती अस्लम राऊत यांच्यासह

श्रीवर्धनमध्ये मंत्री अदिती तटकरे यांना पराभवाचा धक्का

श्रीवर्धन : श्रीवर्धन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले यांनी २१९

शिवसेना-भाजप युतीची एकहाती सत्ता

चंद्रकांत चौधरी नगराध्यक्ष पदावर विजयी माथेरान : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या माथेरान नगर परिषद