वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल


मुंबई  : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


मेट्रो लाईन २बी च्या कामासाठी पाडलेल्या जुन्या स्कायवॉकच्या जागी आता २७८ मीटर लांबीचा आधुनिक पादचारी पूल उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४१.४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढील १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


हा नवीन पूल एस. व्ही. रोडवरून वांद्रे मेट्रो स्थानकाला थेट पश्चिम रेल्वे स्थानकाशी जोडणार आहे. यामुळे रेल्वेतून उतरून मेट्रोकडे जाणाऱ्या किंवा उलट प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना रस्त्यावरील गर्दीत न उतरता सुरक्षित प्रवास करता येईल. विशेषतः लकी हॉटेल जंक्शनवरील सिग्नल आणि वाहनांच्या गर्दीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.


स्थानिकांचा विरोध आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह


नव्या पुलाच्या नियोजनाबाबत स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींची नाराजी आहे. प्रकल्प आखताना स्थानिक एस. व्ही. रोड रहिवासी संघाशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. जुना स्कायवॉक अपग्रेड करण्याऐवजी पुन्हा तोच प्रयोग करणे म्हणजे नियोजनातील त्रुटी आहे, असे स्थानिकांनी सांगितले. नवीन प्रकल्पही जुन्या स्कायवॉकसारखाच 'पांढरा हत्ती' ठरू नये, अशी भीती आहे.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती