निर्देशांक पुन्हा तेजीत...

डॉ. सर्वेश सुहास सोमण


गेल्या चार सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीच्या मालिकेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, रुपयातील स्थिरता आणि 'बँक ऑफ जपान'चा धोरणात्मक निर्णय अपेक्षेनुसार राहिल्याने गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी केली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४८ अंकांनी उसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १५१ अंकांची आघाडी घेत आठवड्याचा शेवट सकारात्मक केला.


निफ्टी ५० मध्ये नफा देणाऱ्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स ३.७१ टक्क्यांच्या वाढीसह बाजी मारली. त्याखालोखाल मॅक्स हेल्थकेअर (२.६१%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.४६%), पॉवर ग्रिड (२.१४%) आणि टाटा मोटर्स (१.५५%) या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. दुसरीकडे आयटी क्षेत्रातील दिग्गज एचसीएल टेकला १.१५ टक्क्यांच्या घसरणीचा फटका बसला. हिंदाल्को (०.५५%), जेएसडब्ल्यू स्टील (०.२५%), कोटक बँक (०.२४%) आणि आयसीआईसीआय बँक (०.२०%) हे शेअर्सही नकारात्मक राहिले. जपानची आघाडीची बँक मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप(एमयूएफजी)ने श्रीराम फायनान्समध्ये ₹३९,६१८ कोटी (सुमारे ४.४ अब्ज अमेरिकन डॉलर) गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीद्वारे एमयूएफजी ने कंपनीतील २०% हिस्सेदारी विकत घेतली आहे. ही गुंतवणूक भारतातील कोणत्याही फायनान्स कंपनीतील सर्वात मोठ्या थेट परदेशी गुंतवणुकांपैकी एक मानली जात आहे. एमयूएफजी चा प्रमुख गुंतवणूकदार म्हणून प्रवेश कंपनीच्या दीर्घकालीन विकास क्षमतेला बळ देईल. यामुळे भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील जागतिक विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.


एमयूएफजीसाठी भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक


सुमारे १३० वर्षे जुनी असलेल्या एमयूएफजी बँकेसाठी ही भारतामधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. एमयूएफजीचे ग्रुप सीईओ हिरोनोरी कामेजावा यांच्या नुसार दोन्ही कंपन्यांचे दीर्घकालीन दृष्टिकोन आणि मूलभूत मूल्ये समान आहेत जे श्रीराम फायनान्सच्या वाढीच्या उद्दिष्टांना पाठबळ देतात.


आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी रुपयानं जोरदार पुनरागमन करत डॉलरच्या तुलनेत सुमारे २% मजबूती दर्शवली. ही गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी एका दिवसातील सुधारणा मानली जात आहे. शुक्रवारी रुपया ८९.२७ च्या पातळीवर बंद झाला, जो आदल्या दिवसाच्या तुलनेत १.१% ची मोठी झेप आहे. काही तासांपूर्वी ९१ च्या पार कमकुवत दिसणारा रुपया पुन्हा एकदा सावरलेला दिसला. या रिकव्हरीमागील सर्वात मोठं कारण आरबीआयची आक्रमक भूमिका हे होतं.


दीर्घकाळ विक्री करणाऱ्या परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात खरेदी केली आहे, जे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक मानलं जात आहे. भविष्यातील वाटचालीबद्दल बोलायचं झाल्यास, बाजार विश्लेषकांचे असे मत आहे की आरबीआयच्या सक्रिय उपस्थितीमुळे नजीकच्या भविष्यात रुपयामध्ये मोठी चढ-उतार होण्याची शक्यता कमी आहे. सध्या ८९.२५ ची पातळी आधार म्हणून आणि ८९.९० च्या आसपासची पातळी महत्त्वाची वरची सीमा मानली जात आहे.


जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने एका वर्षात तब्बल १३९ टक्के परतावा दिला आहे, तर केवळ २०२५ या वर्षात आतापर्यंत १३५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता या शेअरने ३३ टक्क्यांची रॅली केली आहे.


शुक्रवारी बाजारामध्ये हा शेअर ४७५ रुपये या उच्चांकी स्तरावर व्यवहार करत होता. कंपनीने आपल्या भागधारकांसाठी २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली असून, त्यासाठी आता 'रेकॉर्ड तारीख' देखील निश्चित केली आहे. शुक्रवारी या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली. बुधवार २४ डिसेंबर ही बोनस शेअर्ससाठीची रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, ज्या गुंतवणूकदारांकडे रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल, त्यांना अतिरिक्त दोन शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. या बोनस शेअर्सचे वाटप शुक्रवार २६ डिसेंबर रोजी केले जाणार आहे.


पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची २५८००ही महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत ही तेजी टिकून राहील.


(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)
samrajyainvestments@gmail.com


Comments
Add Comment

Gold and silver ETF Prices: सोने-चांदीच्या ETF किमतीत ९ टक्क्यांनी वाढ

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार (US-India Trade Deal) झाला आहे. स्वतः

मुंबईमध्ये 'श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग'चे आयोजन

मुंबई : श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोने मुंबईमध्ये श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंगचे आयोजन केले होते.

सरकारी सुट्टी पण बँकिंग सेवा सुरू राहणार, सरकारी व्यवहारांसाठी RBIचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ चा शेवटचा दिवस असलेल्या ३१ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी सरकारी

पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या दरात वाढ

मुंबई : अमेरिकेच्या विमानवहाक नौकेच्या दिशेने येत असलेले एक इराणी ड्रोन पाडण्यात आले आहे. ही बातमी अमेरिकेच्या

भारतीय शेअर बाजार वधारला, बाजारात उत्साहाचे वातावरण

मुंबई : मुक्त व्यापार करारांच्या बाबतीत भारताची प्रगती उत्साहवर्धक आहे. युरोपियन युनियन सोबतच्या करारामुळे

ग्‍लोबल बिझनेस समिट २०२६

महाराष्‍ट्र सरकारने प्रमुख राज्‍य सहयोगी म्‍हणून ग्‍लोबल बिझनेस समिट २०२६ सोबत सहयोगाची घोषणा केली आहे. हे समिट