१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर
दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर ३४८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. भारतीय संघाकडून ३४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे सलामीला फलंदाजीला उतरले. वैभवने पहिल्याच षटकात दोन षटकार आणि चौकारासह १८ धावा चोपल्या. एका बाजूने वैभव आक्रमक खेळत असताना आयुष म्हात्रे मात्र तिसऱ्या षटकात फरहान युसूफच्या हातून अली रझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो २ धावांवर बाद झाला. त्यानंतरही फलंदाजीला आलेल्या ऍरॉन जॉर्जने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यान चौथ्या षटकात तीन चौकार मारले, मात्र त्यानंतर त्यालाही मोहम्मद सय्यमने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. तो ९ चेंडूंत १६ धावा करून बाद झाला.
तो बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर अली रधाने वैभव सूर्यवंशीलाही बाद करत भारताला धक्का दिला. वैभवचा झेल हामझा झहुरने घेतला. वैभवने १० चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला.
इतकेच नाही, तर उपकर्णधार विहान मल्होत्राही ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे आक्रमक सुरुवातीनंतर भारताने ५९ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. भारतासमोर मोठे लक्ष्य असताना आता हे लक्ष्य पार करण्याची जबाबदारी मधल्या आणि तळातल्या फलंदाजांवर आहे.
तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद ३४७ धावा केल्या. पाकिस्तानकडून समीर मिन्हासने ११३ चेंडूंत १७२ धावा केल्या. अहमन हुसैनने ७२ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. उस्मान खानने ३५ धावांची खेळी केली. भारताकडून दीपेश देवेंद्रनने ३ विकेट्स घेतल्या.