Stock Market Closing Bell: शेअर बाजारात 'ख्रिसमसची' तयारी जोरात,आयटी, मिडकॅप, मेटल शेअरची कमाल! सेन्सेक्स ६३८.१२ निफ्टी २०६.०० अंकाने उसळला 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: शेअर बाजारात अखेरच्या सत्रात आणखी झाल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने मोठी वाढ नोंदवली आहे. सेन्सेक्स ६३८.१२ अंकांने उसळत ८५५६७.४८ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी २०६.०० अंकाने उसळत २६१७२.४० पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे आज सेन्सेक्सला ८५४५० व निफ्टीला २६१५० पातळी पार करण्यास यश मिळाले. आज सकाळच्या सत्रातील मिडकॅपमधील वाढीला मागे टाकत ब्रोकरेजने मिड व स्मॉलकॅपने थेट १.१२% वाढ नोंदवली. स्मॉलकॅपमधील वाढलेल्या ब्रोकरेजच्या आशावादाचा फायदा गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात झाला. आयटी, मेटल, केमिकल्स,ऑटो शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांमध्ये औत्सुक्याचे वातावरण कायम राहिल्याचे स्पष्ट झाले. अस्थिरतेचा जगभरात संमिश्र प्रतिसाद कायम असताना आशियाई बाजारात विशेषतः भारतात मात्र मजबूत फंडामेंटलमुळे बाजार निर्विवादपणे वाढला आहे. कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये किरकोळ घसरणीचा अपवाद वगळता बाजारात नवा ट्रिगर नसतानाही वाढलेल्या स्पॉट व्यवहार वाढल्याचे पहावयास मिळाले दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख गुंतवणूक बाजारात कायम ठेवली असल्याचे चित्र निर्माण होत बाजारातील शुक्रवारचे नफा बुकिंग आता खरेदीत व विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही बूक व्होल्युममध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.


युएस व व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व, इस्त्राईल इराण यांच्यातील तणाव कायम असल्याने आज सोन्याचांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारल्याने त्याचा फायदा बाजारात झाला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक विशेषतः राखल्याने घरगुती गुंतवणूकदारांकडूनही वाढलेल्या एकूण गुंतवणूकीचा फायदा बाजारात झाला. आज शेअर बाजारात अर्थात ब्लू चिप्स शेअर्समध्येही चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, विप्रो अशा शेअर्समध्ये झालेल्या वाढीसह मात्र डिक्सन टेक्नॉलॉजी, अदानी ग्रीन, अदानी गॅस, एचडीएफसी एएमसी, सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज यांसारख्या शेअर्समध्ये झालेल्या किरकोळ घसरणीमुळे बाजारातील रॅलीला मर्यादा आल्या.


बँक ऑफ चीनने एक व तीन वर्षासाठी आपल्या व्याजात स्थिरता ठेवल्याने त्याचा मोठा फायदा आशियाई बाजारात झाला. अमेरिकेतील टेक, एआय शेअर्समध्ये होत असलेल्या वाढीला चीनच्या नव्या निर्णयाच्या ट्रिगरमुळे बाजारात फिल गुड वातावरण कायम होते. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टी (०.६६%) सह सगळ्याच निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ कोसपी (२.०८%), निकेयी २२५ (१.८२%), तैवान वेटेड (१.६२%), सेट कंपोझिट (१.३८%) निर्देशांकात झाली आहे तर युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. डाऊ जोन्स (०.२१%), एस अँड पी ५०० (०.८८%), नासडाक (१.२३%) यांचा या निर्देशांकात ही वाढ झाली आहे.


अखेरच्या सत्रात ज्युपिटर वॅगन्स (१९.२९%), कोचीन शिपयार्ड (७.६२%), देवयानी इंटरनॅशनल (६.४३%), रामकृष्ण फोर्ज (६.४०%), सोलार इंडस्ट्रीज (५.९५%), जीई व्हर्नोवा (५.८४%), माझगाव डॉक (५.५७%), किर्लोस्कर ऑईल (५.४३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण रिलायन्स पॉवर (८.५१%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (५.८७%), सिमेन्स इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (४.७४%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.१९%), इंटलेक्ट डिझाईन (२.४६%), सम्मान कॅपिटल (२.२१%), न्यूलँड लॅब्स (१.८८%), पतांजली फूड (१.६५%) समभागात झाली आहे.


निफ्टीमध्ये सोमवारी आजच्या बाजारातील परिस्थितीवर टेक्निकल विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक रिसर्च विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले आहेत की,'एकत्रीकरण हालचालीतून जोरदार ब्रेकआउट दिसून आला आणि तो २०६ अंकांच्या मोठ्या वाढीसह बंद झाला. ९० अंकांच्या तेजीच्या फरकाने सुरुवात केल्यानंतर, निफ्टी सुरुवातीनंतर लगेचच आणखी वाढला. सत्रामधील मध्य ते उत्तरार्धात तो सकारात्मक कल असलेल्या मर्यादित श्रेणीत स्थिरावला आणि सुरुवातीची तेजीची दरी भरली गेली नाही.


दैनंदिन आलेखावर गॅप-अप ओपनिंगसह एक लांब तेजीची कँडल (Long Speed Candel) तयार झाली. तांत्रिकदृष्ट्या, ही बाजाराची हालचाल २६००० पातळीच्या पातळीजवळच्या महत्त्वपूर्ण अडथळ्याचा आणि त्रिकोणी पॅटर्नचा निर्णायक ब्रेकआउट दर्शवते. हे एक सकारात्मक संकेत आहे आणि हे बाजाराच्या तेजीच्या दिशेने झालेल्या महत्त्वपूर्ण ट्रेंड बदलाचे प्रतिबिंब आहे. नजीकच्या काळात २६३००-२६४०० पातळीच्या पातळीवर पुढील तेजीच्या पातळ्यांवर लक्ष ठेवावे. तात्काळ आधार (Immediate Support) २६००० पातळीवर आहे.

Comments
Add Comment

काय सांगता ? सोन्याचांदीच्या दरात झाली घसरण ?

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी

शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व -

रेल्वे मार्गावर धुराचे लोट येताच उडाला गोंधळ, पसरले भीतीचे वातावरण; नेमका कसला होता 'तो' धूर जाणून घ्या

ठाणे : शुक्रवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पसरलेल्या धुरामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. मध्य रेल्वेवर

तब्बल ४६ वर्षांनंतर भांडुप संकुला २००० दलशक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प येत्या एप्रिल २०२९ पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई :  भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण

सुनेत्रा पवार शनिवारी सायंकाळी ५ वाजता घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ, सूत्रांची माहिती

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अनधिकृतपणे जाहिरात फलक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारुन