NSE Report: देशात गुंतवणूक डंके की चोट पे! ९.७ लाख कोटीचा निधी एक वर्षात 'यातून' उभा महत्वाची माहिती पुढे

मोहित सोमण: नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (National Stock Exchange) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत शेअर बाजारात निधी उभारणी मोठ्या प्रमाणात राहिली असून आर्थिक वर्ष २६ मध्ये नोव्हेंबरपर्यंत ८३ कंपन्यांनी १.३ लाख कोटी रुपये उभे केले आहेत. मोठ्या प्रमाणात समाजाच्या प्रत्येक स्तरावर आयपीओतील गुंतवणूक वाढ केल्याने अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एनएसईने मासिक मार्केट प्लस डिकोडेड २०२५ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातील निरिक्षणानुसार , संपूर्ण आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात आयपीओतून भांडवल निर्मिती झाली आहे. आपल्या अहवालात एनएसईने म्हटले आहे की, मेनबोर्डवर, ८३ कंपन्यांनी १.३ लाख कोटी रुपये उभे केले, ज्यात ४१% निधी नवीन इक्विटीद्वारे आणि ५९% निधी 'ऑफर फॉर सेल' (Offer for Sale) द्वारे उभारण्यात आला आहे.


आयपीओतील निधी उभारणीची गती मोठ्या संख्येने वाढली असून या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती झाली असल्याचे अहवालाने नमूद केले आहे. नवीन इक्विटीमध्ये, कंपनी नवीन शेअर्स तयार करून ते जनतेला विकते. या नवीन शेअर्समधून उभारलेला सर्व पैसा थेट कंपनीकडे जातो, जी नंतर तो निधी व्यवसाय विस्तारण्यासाठी, नवीन प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी किंवा कर्जे फेडण्यासाठी वापरते. याउलट, ओएफएसमध्ये (ऑफर फॉर सेल) कंपनीचे संस्थापक किंवा सुरुवातीचे गुंतवणूकदार यांसारखे विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे आधीपासून असलेले मालकीचे शेअर्स नवीन गुंतवणूकदारांना विकतात.


अहवालात पुढे नमूद केले आहे की, या नव्याने सूचीबद्ध (Listed) झालेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल आता १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, जे देशांतर्गत बाजारातील अलीकडील विस्ताराची व्याप्ती दर्शवते. ही वाढ भारतीय भांडवली बाजारांची मोठ्या प्रमाणात निधी उभारणी आकर्षित करण्याची आणि विविध क्षेत्रांतील कंपन्यांना पाठिंबा देण्याची वाढती क्षमता देखील दर्शवते. अहवालातील माहितीनुसार, गुंतवणूकदारांच्या सहभागाच्या पद्धतींमध्येही लक्षणीय कल दिसून आले. केवळ किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग २५% वाढला.त्यामुळे प्राथमिक बाजारातील ऑफरमध्ये (IPO) वैयक्तिक गुंतवणूकदारांची आयपीओतील वाढलेल्या कलाची नोंद घेतली गेली आहे. त्याच वेळी पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा वाटा मात्र तुलनेने कमी झाला आहे असे अहवालात म्हटले आहे.


एनएसईच्या अहवालात 'इमर्ज' प्लॅटफॉर्मद्वारे एसएमई (SME) विभागातही सातत्यपूर्ण गती असल्याचे नमूद केले आहे.'इमर्ज' प्लॅटफॉर्मवर ८० कंपन्या सूचीबद्ध झाल्या आणि त्यांनी एकूण ३९११ कोटी रुपये उभे केले. विशेष म्हणजे, या रकमेपैकी ९५% निधी नवीन इक्विटीद्वारे उभारण्यात आला. खासकरून लहान आणि मध्यम उद्योगांना वाढीसाठी भांडवलीसाठी ही रक्कम कामी येते. याव्यतिरिक्त, अहवालात म्हटले आहे की, अलीकडील नियामक उपायांमुळे भारताची सूचीकरण परिसंस्था (Listing Ecosystem) आणखी मजबूत झाली आहे.


या उपाय योजनेत किमान सार्वजनिक भागविक्रीची आवश्यकता कमी करणे, मोठ्या संस्थांसाठी किमान सार्वजनिक भागभांडवल साध्य करण्यासाठी मुदतवाढ देणे, 'इमर्ज' प्लॅटफॉर्मवरून मेनबोर्डवर जाणाऱ्या एसएमई कंपन्यांसाठी स्थलांतर निकष सुलभ करणे आणि डिस्क्लोजर संबंधित नियम अधिक कठोर करणे यांचा समावेश असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. एकंदरीत, अहवालाने असा निष्कर्ष काढला की भरीव निधी उभारणीची प्रक्रिया, किरकोळ गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग आणि सहाय्यक नियामक उपाययोजना (Regulatory Measures) यामुळे दीर्घकालीन वाढ आणि विस्ताराला चालना देण्यासाठी भारताच्या भांडवली बाजारांची भूमिका अधिक मजबूत होत आहे.


एनएसईवरील मार्केट प्लस असलेल्या ईपीआर (Economic Policy and Research EPR) अहवालातील आणखी महत्वाची उपयुक्त माहिती -


१) भारताच्या भांडवली बाजारांनी आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत मजबूत लवचिकता (Flexibility)


२) इक्विटी आणि कर्जाद्वारे ९.७ लाख कोटी रुपये उभे केले गेले जो निधी इयर ऑन इयर बेसिसवर १३% जास्त आहे


३)इक्विटीद्वारे निधी उभारणी २ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली ज्यात आयपीओमधून ६४३६३ कोटी रुपयांचा समावेश


४)१२२ नवीन सूचींमुळे (५४ मेनबोर्ड, ६८ एसएमई) बाजार भांडवलात ४.१ लाख कोटी रुपयांची भर


५) टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०२५ मध्ये विक्रमी आयपीओ व्यवहार


६) एनएसईचा नोंदणीकृत गुंतवणूकदार वर्ग २२ सप्टेंबर २०२५ रोजी १२ कोटींच्या पुढे गेला. केवळ आठ महिन्यांत १ कोटींची वाढ


७) गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास २५% आहे; ५५.६% नवीन गुंतवणूकदार ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत


८) उत्तर प्रदेश सलग ३२ व्या महिन्यासाठी नवीन नोंदणीमध्ये आघाडीवर होता


९) एकूण क्लायंट खात्यांची संख्या अंदाजे २३.७ कोटींवर पोहोचली.


बाजारातील इतर माहिती -


इक्विटी कॅश एडीटी मासिक तुलनेत ५.१% वाढून ९८,३१२ कोटी रुपयांवर पोहोचला; इक्विटी ऑप्शन्स एडीटी वाढून ४८,६६२ कोटी रुपये


एक्सपायरी मंगळवारी स्थलांतरित केल्यामुळे निफ्टी५० प्रीमियम उलाढाल मासिक तुलनेत २.७% वाढून ३७३९३ कोटी रुपयांवर पोहोचली


एकूणच, बाजारात दररोज सरासरी ८.५ कोटी व्यवहार


वीजेतील फ्युचर्समुळे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज एडीटी व्यवहार विक्रमी १०६ कोटी रुपयांवर


वैयक्तिक गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला, सप्टेंबरमध्ये १.१९ कोटी गुंतवणूकदारांचा कॅश इक्विटीमध्ये सहभाग


डेरिव्हेटिव्ह्जमधील किरकोळ सहभाग ३३.६ लाखांपर्यंत वाढला, त्यापैकी ७७% गुंतवणूकदार कॅश इक्विटीमध्येही सक्रिय


उलाढाल काही ठराविक गुंतवणूकदारांमध्येच केंद्रित


शीर्ष (Top) ०.२% गुंतवणूकदारांनी इक्विटी कॅश उलाढालीपैकी ७७% उलाढाल केली


शीर्ष ०.३% ऑप्शन्स व्यापाऱ्यांनी प्रीमियम उलाढालीत ६९% योगदान दिले


आर्थिक वर्ष २६ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.८% (आरबीआय) आहे, तर महागाई २.६% पर्यंत कमी होण्याची शक्यता


सप्टेंबरमध्ये सीपीआय आणि डब्ल्यूपीआय महागाई कमी झाली


ऑगस्टपर्यंत वित्तीय तूट आर्थिक वर्ष २६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ३८% होती


मजबूत बँक कर्जपुरवठ्यामुळे क्रेडिट-डिपॉझिट गुणोत्तर ८०% च्या वर गेले.


मान्सून अतिरिक्त पर्जन्यासह संपला जो २००१ पासूनचा सर्वाधिक पाचवा दर ज्याचा ग्रामीण भागात फायदा


जागतिक अनिश्चितता उच्च पातळीवर कायम


भूराजकीय जोखीम काही प्रमाणात कमी झाली


सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ५.०५ ट्रिलियन आहे


१२ कोटींहून अधिक पॅन लिंक गुंतवणूकदार, जे ९९.८५% पिन कोड्सना व्यापतात


निफ्टी निर्देशांकांचा मागोवा घेणारी पॅसिव्ह एयूएम (Pasive Asset Under Management AUM) ९७.२ अब्ज डॉलर्सवर


एनएसई जगातील सर्वात मोठा डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज


व्यवहारांच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा इक्विटी एक्सचेंज बनला.

Comments
Add Comment

Maharashtra Local Body Elections : "विरोधकांचे 'नरेटिव्ह' भुईसपाट..."; भाजपच्या ऐतिहासिक यशावर मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर सणसणीत टोलेबाजी!

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राचे राजकीय चित्र पुन्हा एकदा

अल्ट्राटेक सिमेंटला ७८२.२ कोटींची जीएसटी नोटीस

मोहित सोमण: अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड (Ultratech Cement) कंपनीला जीएसटी विभागाने ७८२.२ कोटीची नोटीस दिल्याचे कंपनीने

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती १५० हून अधिक जागा जिंकणार

कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास, विविध राजकीय पक्षांच्या शेकडो

निसस फायनान्स सर्विसेसकडून दुबईत ५३६ कोटीची नवी गुंतवणूक

मोहित सोमण: निसस फायनान्स सर्विसेस (Nisus Finance Services NIFCO) इन्व्हेसमेंट व फंड मॅनेजर कंपनीने युएई येथे ५३६ कोटींची गुंतवणूक

NFO Alert: आयसीआयसीआय प्रुडेंशियल इन्शुरन्स कंपनीकडून नवा Pru Sector Index Fund बाजारात लाँच

मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेंशियल इन्शुरन्स कंपनी (ICICI Prudential Life Insurance Company) आपला नवा आयसीआयसीआय प्रु सेक्टर इंडेक्स फंड

हैदराबादमध्ये निधी अग्रवालनंतर समंथा प्रभूभोवती चाहत्यांचा गराडा, व्हिडीओ व्हायरल

हैद्राबाद : दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवालप्रमाणेच आता समंथा रूथ प्रभूही चाहत्यांच्या गर्दीत अडकली आहे.