अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच

भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी; शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर पराभूत


अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदावर भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या तेजश्री करंजुळे पाटील या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. मात्र, नगरसेवक संख्येत शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर राहिली असून, पक्षाचे सर्वाधिक २३ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.


नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या मनिषा वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुळे पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेरीस भाजपने नगराध्यक्षपद पटकावत सत्ता मिळवली. नगराध्यक्ष भाजपचा असला, तरी नगरसेवक संख्येत शिंदेसेनेची आघाडी कायम राहिल्याने अंबरनाथमधील सत्तासमीकरणे संतुलित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


विजयी नगरसेवकांची यादी :


भाजप (१०): स्वप्ना गायकवाड, मीना वाळेकर, रंजना कोतेकर, मनीष गुंजाळ, अभिजीत करंजुळे, जयश्री थर्टी, अनिता भोईर, सुजाता भोईर, सचिन गुंजाळ, सुप्रिया आतिष पाटील.


शिवसेना (शिंदे गट) (२३): संगीता गायकर, रेश्मा गुडेकर, राहुल सोमेश्वर, निखिल चौधरी, ज्योत्सना भोईर, कुणाल भोईर, अपर्णा भोईर, पल्लवी लकडे, विकास सोमेश्वर, स्वप्निल बागुल, पुरुषोत्तम उगले, संदीप भराडे, कल्पना गोरे, रोहिणी भोईर, संदीप तेलंगे, अजय मोहिरीकर, सचिन मंचेकर, रेश्मा सुर्वे, सुनीता बागुल, रवींद्र करंजुळे, दीपक गायकवाड, रवी पाटील, राजेंद्र वाळेकर.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (४): सदाशिव पाटील, सचिन पाटील, मीरा शेलार, सुनीता पाटील.


काँग्रेस (१२): तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी देवडे, दिनेश गायकवाड, किरण राठोड .


५९ नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत निकाल पुढीलप्रमाणे लागला


शिवसेना (शिंदे गट) : २३ जागा


काँग्रेस : १२ जागा


भाजप : १० जागा


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ४ जागा

Comments
Add Comment

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी  एकूण ७,१७,१०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण ५२.११% मतदान !

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी दि.15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९,१७,१२३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; एकूण ५५.५९ टक्के टक्के मतदान

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत

ठाण्यात सुमारे ५५ टक्के मतदान

मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३०

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने