विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत


कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नाही, तर ते समाजाचे एक महत्त्वाचे युनिट आहे. जर तुम्ही जबाबदारी घेण्यास तयार नसाल, तर ते योग्य नाही," अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिव्ह-इन संस्कृतीसंदर्भात आपले मत व्यक्त केले. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप, लग्नाचे वय तसेच, देशाच्या लोकसंख्या धोरणासंदर्भात विचार मांडले. ते म्हणाले, कुटुंबच आपल्याला समाजात कसे राहावे, हे शिकवते. हे सर्व आपला देश, समाज आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवण्याचे साधन आहे. जर आपली लग्न करण्याची इच्छा नसेल, तर ठीक आहे. आपण संन्यासी होऊ शकतो. मात्र, आपण तेही होणार नसाल तर, जबाबदारी घेणार नसाल, तर कसे चालेल?"


भागवत पुढे म्हणाले, मी डॉक्टर वैगेरे मंडळींशी चर्चा करून काही माहिती घेतली. जर लग्न १९ ते २५ वर्षांदरम्यान झाले आणि दाम्पत्याला तीन मुले असतील, तर माता-पिता आणि मुलांचे आरोग्य उत्तम राहते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनानुसार, तीन मुले असल्यास मुलांमध्ये अहंकार व्यवस्थापन विकसित होण्यास मदत होते. लोकसंख्याशास्त्राचा दाखला देत ते म्हणाले की, जर जन्मदर २.१ च्या खाली गेला तर तो समाजासाठी धोकादायक ठरतो. सध्या बिहारमुळे आपला दर २.१ वर असून अन्य राज्यांत तो १.९ पर्यंत खाली आला आहे.


लोकसंख्याशास्त्राचा दाखला देत ते म्हणाले की, जर जन्मदर २.१ च्या खाली गेला तर तो समाजासाठी धोकादायक ठरतो. सध्या बिहारमुळे आपला दर २.१ वर असून अन्य राज्यांत तो १.९ पर्यंत खाली आला आहे. लोकसंख्या हे केवळ ओझे नसून ती एक प्रकारची संपत्तीही आहे. प्रभावी लोकसंख्या धोरण बनवणे आवश्यक आहे. देशाचे पर्यावरण, पायाभूत सुविधा, महिलांचे आरोग्य आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या अंदाजावर आधारित सर्वसमावेशक धोरण आखले जायला हवे. "मी स्वतः अविवाहित प्रचारक असल्याने मला यातील तांत्रिक माहिती नाही, मात्र तज्ज्ञांकडून मिळालेली ही माहिती समाजाच्या हितासाठी महत्त्वाची आहे," असेही भागवत यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ