मोहित सोमण: पहिल्या दिवशीच गुजरात किडनी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लिमिटेड आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला होता. आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी कंपनीचा आयपीओ 'फूल' झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्याच दिई कंपनीला एकूण १.३१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे एकूणच १३२२६८८० शेअर तुलनेत आयपीओसाठी १७३४०२८८ वेळा बिडींग (बोली) मिळाल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या दिवशी कंपनीला एकूण रिटेल गुंतवणूकदारांकडून ४.३८ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.३४ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.५३ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे २५०.८० कोटींच्या या आयपीओला अनपेक्षितपणे चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले. आज २२ डिसेंबर ते २४ डिसेंबर कालावधीत हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असून ३० डिसेंबरला कंपनीचा शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४५९२ रुपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली असून प्राईज बँड १०८ ते ११४ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.
२०१९ साली स्थापन झालेल्या कंपनी झालेली गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी लिमिटेड (GKASSL) ही कंपनी गुजरात राज्यातील विविध ठिकाणी दुय्यम आणि तृतीय श्रेणीच्या आरोग्यसेवा पुरवते. कंपनीच्या पोर्टफोलिओत एकूण ४९० खाटांची (Beds) क्षमता, ४५५ खाटांची मंजूर क्षमता (Approved Bed) आणि ३४० खाटांच्या कार्यान्वित क्षमतेसह सात मल्टीस्पेशालिटी रुग्णालये आणि चार फार्मसीचा समावेश आहे. यात कंपनीच्या रुग्णालयांमध्ये गुजरात किडनी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (वडोदरा), गुजरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (गोधरा), राज पामलँड हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड (भरुच), मेसर्स सूर्या हॉस्पिटल अँड आयसीयू (बोरसद), गुजरात सर्जिकल हॉस्पिटल (वडोदरा) आणि अश्विनी मेडिकल सेंटर (आणंद) यांचा समावेश आहे. ही कंपनी अश्विनी मेडिकल स्टोअर (आणंद) देखील चालवते.
आयपीओआधीच कंपनी अँकर गुंतवणूकदारांकडून १००.०१ कोटीची गुंतवणूक प्राप्त केली होती. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation)८९८.८१ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ६३७% अधिक महसूल मिळाला असून करोत्तर नफ्यात ४५४% वाढ झाली आहे. कंपनीच्या आरओई (Return on Equity) ३६.६१% असून आरओसीई (Return on Capital Employed ROCE) ३७.६५% आहे. डॉ. प्रग्नेश यशवंतसिंह भरपोडा, डॉ भारतीबेन प्रग्नेश भरपोडा, डॉ. यशवंतसिंह मोतीसिंह भरपोडा आणि अनिताबेन यशवंतसिंह भरपोडा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.