निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मुंबई : मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. वेगळे आशयविषय घेऊन आलेले मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली हलकीफुलकी गोष्ट असलेला अरविंद जगताप लिखीत आणि दिनेश जगताप दिग्दर्शित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे.


हा चित्रपट ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज (waves) ओ.टी.टी. चॅनलवर जगभरात प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रविण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, सुनिल अभ्यंकर आदी कलाकारांच्या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी आहेत.


एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची, नवरा बायकोच्या प्रेमाची आणि त्यासोबत बापलेकाच्या नात्याची रंजक कथा लेखक अरविंद जगताप यांनी मिश्कीलपणे मांडली आहे. ही आणीबाणी कोणासाठी अडचणीची ठरणार ? आणि कोण यातून सहीसलामत बाहेर पडणार याची मनोरंजक कथा पहायला मिळणार आहे

Comments
Add Comment

Dhurandar 2 : बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आता 'या' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार धुरंधर २

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असून सिनेमा रिलीज होऊन २१ दिवस उलटले असतानाही

Matka King : दमदार स्टारकास्ट असणाऱ्या नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा

Shantecha Karte Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. यांपैकीच'शांतेचं कार्टं चालू आहे' हे एक

Gayatri Datar : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला 'हा' धक्कादायक प्रकार, पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार ( Gayatri Datar) सध्या तिच्या वैयक्तिक

Bigg Boss Marathi 6 : राखी सावंतनं मर्यादा ओलांडल्या, दीपाली आणि राकेशबाबत केलं 'हे' वक्तव्य

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. याचबरोबर घरात राखी सावंतनं एन्ट्री घेतल्यानंतर

Dhurandhar 2 : अखेर 'धुरंधर २' सिनेमाबाबत दीपिकानं सोडलं मौनं, ट्रोल करणाऱ्यांना म्हणाली....

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई केली